येवला : शिवसेनेत (Shivsena) अनेक बंड झाले पण प्रत्येकवेळी पक्षाची ताकद वाढतच गेली आहे. आताही आमदारांनी बंड केले असले तरी पक्ष पुन्हा निष्ठावंत शिवसैनिक आणि मतदारांच्या ताकदीवर उभारी घेईल. कट्टर शिवसैनिकच या बंडखोरांना धडा शिकवतील, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे (Jayant Dinde) यांनी केले. (Shivsena followers in mood to demonstrate there power)
बंडखोरी करून आमदार गुवाहाटी येथे पळाले. त्यांना अप्रत्यक्षरित्या भाजपचीच फूस असून महाराष्ट्र हा छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे. भाजपच्या या कुटनितीचा धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शिवसेनेचे ४० आमदार बंडखोरी करून गुवाहाटी येथे गेल्याने त्यांच्या निषेधार्थ व शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ येथे विंचूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना दिंडे बोलत होते.
तत्पूर्वी श्री. दिंडे, आमदार नरेंद्र दराडे, युवा नेते संभाजी पवार, युवा सेनेचे विस्तारक कुणाल दराडे, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरनारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, वाल्मीक गोरे यांच्या नेतृत्वाखाली शनी पटांगणातील शिवसेना भवन ते विंचूर चौफुली येथे कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात आली. या प्रसंगी विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर शिवसैनिकांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्या. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचा निषेध केला.
या प्रसंगी कुणाल दराडे यांनी पक्षाची ताकद वाढत असताना असा प्रकार झाल्यामुळे शिवसैनिकांना धक्का बसला आहे. निष्ठावंत शिवसैनिक व युवा सेनेचे कार्यकर्ते बंडखोरांना धडा शिकवून नव्याने पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून देतील असा विश्वास दराडे यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य कार्यकर्ते हीच शिवसेनेची ताकद असून हीच ताकद यापुढील काळात दिसून येईल, असे तालुकाप्रमुख बोरनारे म्हणाले.
यावेळी महिला आघाडीने बंडखोर आमदारांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटक भारती जाधव, तालुका प्रमुख सुमित्रा बोठे, वाल्मीक गोरे, शहर संघटक राहुल लोणारी, नगरसेवक झामभाऊ जावळे, छगन आहेर, पुंडलिक पाचपुते, चंद्रमोहन मोरे, खंडू साताळकर, विठ्ठल महाले, शरद लहरे, अरुण शेलार, लक्ष्मण गवळी, धीरज परदेशी, महेश सरोदे, दीपक भदाणे, चंद्रकांत शिंदे, दिलीप मेंगाळ, राकेश गिरासे, वर्षा कदम, दीपाली नागपुरे, शकुंतला नागपुरे, कोमल शिकलकर, पुनम पमते, अशोक आव्हाड आदी उपस्थित होते.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.