Shivsena (Shinde group) Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Jalgaon News : जळगावमध्ये शिंदे गटाचीच सत्ता आली पाहिजे!

Registered so many members, so thet Shinde group will be in Power-शिवसेनेच्या शिंदे गटाच्या तालुका मेळाव्यात जळगाव जिल्ह्यात भगवा फडकविण्याचा निर्धार

Sampat Devgire

Eknath Shinde Group News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेनेदेखील सदस्य नोंदणी सुरू केली आहे. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Shinde group appeal followers for Membership registration)

जळगाव (Jalgaon) शहरात शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाचा (Eknath Shinde) मेळावा झाला. त्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

या वेळी जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभासद नोंदणी करावी, जनतेशी संपर्क साधून जळगाव ग्रामीणवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.

शिवसेना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन करतानाच पक्षासाठी प्रत्येकाने झाेकून देऊन काम करावे. घरोघरी जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षासाठी एवढी सदस्य नोंदणी करावी की, ग्रामीण भागात केवळ आपल्याच पक्षाची सत्ता आली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी जिल्हा परिषद सदस्य पाटील अध्यक्षस्थानी होते. शिवराज पाटील, पवन सोनवणे, सरलाताई कोल्हे, संजय पाटील, नरेंद्र सोनवणे, अनिल भोळे, तुषार महाजन, किशोर चौधरी, माजी सभापती नंदलाल पाटील, मुकुंदराव नन्नवरे, जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT