Ramesh Pawar, Commissioner, Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

लक्षात ठेवा, कामात गुणवत्ता नसेल तर जेलची हवा खाल!

महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी अधिकारी, ठेकेदारांच्या बैठकीत पूर्वकल्पना दिली.

Sampat Devgire

नाशिक : कामात कडकपणे गुणवत्ता (Quality work) तपासली जाईल. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रणविषयक नियम कायदे समजून घ्या. भविष्यात नियमच माहिती नाही. कारवाईत शिथिल करा, हे ऐकून घेतले जाणार नाही. यासंदर्भात गाफील कंत्राटदारांना (Contractors may send behind the bar) जेलची हवी देखील खायला लावले आहे, अशा शब्दात महापालिका आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी ठेकेदारांची हजेरी घेतली. (NMC Commissioner warns contractors for quality work)

महापालिका आयुक्तांनी

अधिकारी, कंत्राटदारांची बैठक घेऊन कामाच्या गुणवत्तेविषयी पूर्वकल्पना दिली. श्री. पवार यांनी महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांची बैठक घेतली. एका बाजूला अधिकारी दुसऱ्या बाजूला ठेकेदार अशा दोन्ही बाजूला समोरासमोर झालेल्या एकत्रित बैठकीत श्री. पवार यांनी कामाच्या गुणवत्ताविषयक नियम, कायदे आणि निकषांबाबत गंभीर असल्याचे स्पष्ट शब्दात समज दिली.

...त्यासाठी पूर्वकल्पना

श्री. पवार म्हणाले, की काही दिवसांपासून शहरात दौरे करीत आहे. रस्त्यांच्या कामांत मधोमध असलेले चेंबर खड्ड्यात गेलेले आहेत. रस्त्यांच्या लगत नियमानुसार पाथ होल नाही. चेंबरचे पावसाळी पाणी जाण्याचे नाले बुजले आहेत. काही ठिकाणी चेंबरचे होल बुजले आहेत. रस्त्याच्या दोन्ही कडेला पांढरे पट्टे असावेत. गतिरोधक कसे असावेत, याचे नियम आहे. बेढब स्वरूपाचे कसे तरी ते टाकलेले असतात. अशा अनेक कामात गुणवत्ता पाळली गेल्याचे दिसत नाही. त्यामुळे भविष्यात जी कामे होतील. ती गुणवत्तेशी तडजोड करून होणार नाहीत. गुणवत्तेशी तडजोड दिसल्यास तेथे हमखास कारवाई होईल, याची ठेकेदार आणि अधिकारी अशा दोघांनी काळजी घ्यावी.

ठेकेदार तुरुंगात

कामाची गुणवत्ता राखली गेली नाही म्हणून मुंबईत काही ठेकेदारांना थेट सहा सहा महिने तुरुंगात जावे लागले. त्यात अनेक कामांचे अनुभव असलेले नामांकित ठेकेदारही होते. तसे केवळ गुणवत्ता नियंत्रणविषयक नियम कायदेच माहिती नसलेले अनेक जण होते. मात्र, चौकशीत दोषी आढळल्याने संबधितांवर कारवाई झाली. माहिती नसल्याने त्यांना कारवाईचा सामना करावा लागला. त्यामुळे यापुढे नियम, कायदे समजून घेऊन त्यानुसार गुणवत्तापूर्ण कामेच नाशिकला होतील. याबाबत गंभीर रहा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT