Rohini Khadse & Gulabrao Patil
Rohini Khadse & Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कोरोनाच्या पत्रातून रोहिणी खडसेंचा गुलाबराव पाटलांना झटका?

Sampat Devgire

जळगाव : गेले काही दिवस जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात खडसे विरुद्ध शिवसेना असे राजकीय युद्ध सुरु आहे. त्यात शिथीलता येत असतानाच काल अ‍ॅड. रोहिणी खडसे (Adv. Rohini Khadse) यांच्या लेटर बॅाम्बने कोरोनाच्या विषयावरून नवा वाद सुरु झाला आहे. थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनाच ही विरोध ठरू शकतो.

नियोजन विभागामार्फत कोविडच्या उपाययोजनांसाठी करण्यात आलेल्या ४४ कोटी रुपयांच्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यास नियोजन समितीच्या सदस्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी विरोध नोंदविला आहे. दरम्यान या खर्चापोटी सादर करण्यात आलेल्या अनुपालन अहवालावरही त्यांनी आक्षेप घेतला असून या प्रकरणाची विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी व्हावी, अशा मागणीचे पत्र त्यांनी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

जिल्हा नियोजन मंडळामार्फत कोविडच्या उपाययोजनांसाठी ४४ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या निधीस कार्योत्तर मंजुरी देण्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाला शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या नेत्या तथा नियोजन समिती सदस्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनीही आक्षेप घेत विरोध असल्याचे पत्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे. या पत्रात त्यांनी अनुपालन अहवालात नमूद केलेल्या बऱ्याच बाबी संदिग्ध असून त्यामधून पूर्णत: खुलासा होत नाही. अनुपालन अहवालात बहुतांशी गोष्टींचा खुलासा सिव्हिल सर्जन यांनी केलेला आहे.

या प्रकरणातील सर्व बाबी ह्या जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी निगडीत आहेत. त्यामुळे या प्रकरणी चौकशी त्यांच्याकडून करणे योग्य होणार नाही. म्हणून ही चौकशी शासनाच्या स्पेशल ऑडिटर यांच्यामार्फत होणे गरजेचे आहे किंवा अन्य त्रयस्थ एजन्सीकडून होणे गरजेचे आहे. व्हेंटीलेटर खरेदी प्रक्रिया व अनुपालन अहवालात नमूद केलेल्या बाबी संशयास्पद आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर विषयास स्थगिती देण्यात यावी व माझा स्पष्ट विरोध नोंदविण्यात यावा असे नमूद केले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT