Rohini Khadse , Nishikant Dubey  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohini Khadse : निशिकांत दुबे काय तुमचा जावई आहे का? रोहिणी खडसेंचा प्रशासनाला संतप्त सवाल...नेमकं प्रकरण काय?

Rohini Khadse On Nishikant Dubey : मराठी लोगो को हम पटक पटक के मारेंगे' म्हणणाऱ्या महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे याच्यासाठी महाराष्ट्र प्रशासन पायघड्या घालत असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुण्यातील भीमाशंकर मंदिर हे दुरुस्तीच्या कामासाठी गेले अडीच महिन्यांपासून सर्व सामान्य भाविक भक्तांसाठी बंद आहे. मात्र झारखंड राज्यातील भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

मंदिराचे सभामंडप व पायरी मार्गाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तप अनुष्ठाने करून हजारो किलोमीटर पायी व सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे. असे असताना १४ मार्च रोजी हेलिकॉप्टरने आलेल्या खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याने भाविक भक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अगदी महाशिवरात्रीच्या दिवशीही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने भाविक भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी देखील यावरुन थेट प्रशासनावर टीका केली आहे.

रोहिणी खडसे यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी लिहले आहे की, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आपल्या महाराष्ट्रातील भीमाशंकर मंदिर पुरातत्त्व विभागाच्या कामासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद आहे पण भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी हे मंदिर खुले करण्यात आले.

हे निशिकांत दुबे कोण आहेत माहिती आहे का ? जे नेहमी मराठी माणसाला कमी लेखतात, जे नेहमी मराठी माणसांबद्दल चुकीचे विधान करून मराठी माणसांचा स्वाभिमान दुखवतात. एकदा ते म्हणाले की "मराठी लोगो को हम पटक पटक के मारेंगे' आज त्याच निशिकांत दुबेसाठी महाराष्ट्रातील प्रशासन पायघड्या घालत आहे. सामान्य माणसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे यांना वेगळा न्याय का ? दुबे काय तुमचा जावई आहे का? असा संतप्त सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थितीत केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT