Rohini Khadse, Eknath Khadse

 

sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

मी खाली वाकले नसते तर जीव गेला असता... रोहिणी खडसेंनी सांगितला घटनाक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे Rohini Khadse यांच्या गाडीवर सोमवारी रात्री हल्ला करण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. शिवसेनेच्या (ShivSena) पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप रोहिणी खडसे केला आहे. हा हल्ला मला घाबरवण्यासाठी होता, मात्र मी या हल्ल्याने घाबरणारी नाही, असा निर्धार त्यांनी आज. (ता २८) व्यक्त केला.

या वेळी खडसे म्हणाल्या ''मी महिलांच्या पाठीशी आहे. अशीच कायम उभी राहणार आहे. रोहिणी खडसे यांनी बोदवड नगपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी या हल्ल्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवसेना कार्यकर्त्यांकडे बोट दाखवले. निवडणुकीत मतदानाच्या दिवशी आमचे जिल्हाध्यक्ष आणि मी मतदान केंद्रांवर फिरत होतो. तेव्हा शिवसेनेच्या लोकांनी आमच्याशी हुज्जत घातली आम्हला धक्काबुक्की केली. आम्ही पोलिसांना याप्रकरणी निवेदन दिले होते, असेही त्यांनी म्हटले. मुक्ताईनगरमधील अवैध धंद्याबाबतही आम्ही लेखी तक्रार दिली होती, असे सांगत त्या म्हणाल्या येथूनच हल्ल्याची पार्श्वभूमी तयार झाली, असा आरोप त्यांनी केला.

माझे मोठे बंधू निखिल खडसे यांची जयंती ३१ डिसेंबरला असते. त्यानिमित्ताने आम्ही सूतगिरणीत जमा होतो. त्यांना श्रद्धांजली अर्पण कतो. त्यामुळे तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यानंतर चांगदेवला एका हळदीला कार्यक्रमाला गेले. तिथून मी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन १०-१५ मिनिटे बसले. त्यावेळी तुमच्याविरोधात संपूर्ण मतदार संघात वातावरण तयार केले जात आहे. काहीजण तुम्हाला फिरु देणार नाही, असे सांगत पदाधिकाऱ्यांनी काळजी व्यक्त केली होती. मी त्यांना काळजी करु नका, असे सांगितले, अशी माहिती रोहिणी खडसे यांनी यावेळी दिली.

'एका जवळच्या रस्त्यातून निघत असताना आमच्यासोर तीन दुचाकी आल्या. त्यांनी आमची गाडी अडवली. एका दुचाकीवर तीन, आणि इतर दोन्हींवर दोन-दोन असे सात लोक होते. दुचाकीवर मागे बसलेले चौघे गाडीच्या दिशेने आले. यावेळी एकाच्या हातात पिस्तूल आणि एकाच्या हातात तलवार व रॉड होता. ते माझ्या बाजूला आले, एकाने माझ्यावर पिस्तूल रोखून धरले. आमच्या गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उघडत नसल्याने त्यांनी रॉड काचेवर मारला. मी खाली वाकले म्हणून वाचू शकले. मला ठार मारण्याच्या हेतूने ते लोक आले होते, हे स्पष्ट आहे. कारण त्यांनी माझ्याच बाजूने हल्ला केला,'' असा खळबळजनक आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

मी लगेच ड्रायव्हरला गाडी पळवायला सांगितली. पोलिस येईपर्यंत ते लोक फरार झाले. घरी पोहोचल्यावर गाडीचे नुकसान कळाले. या घटनेत शिवसेनेचे कार्यकर्ते असून त्यांची नावे तक्रारीत दिली आहे. माझा न्यायव्यवसथेवर विश्वास आहे, असेही रोहिणी खडसे यांनी सांगितले. शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई हे या हल्ल्यात सहभागी होते, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. हातात पिस्तूल असलेला सुनील पाटील होता. त्याने काही दिवसांपूर्वीच महिला पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन हात ओढण्याचा प्रकार केला होता, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. ज्याच्या हातात तलवार होती तो पंकज कोळी चांगदेव ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. छोटू भोईने रॉडने हल्ला केला. इतर चौघांनाही मी ओळखू शकते, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT