राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिनी खडसेंच्या गाडीवर हल्ला

राजकीय डावपेचांतूनच हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Rohini Khadse

Rohini Khadse

sarkarnama

Published on
Updated on

जळगाव : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या तथा जिल्हा सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. चांगदेव येथून एका कार्यक्रमातून घरी येत असताना सूतगिरणी रस्त्यावर अज्ञातांनी हल्ला केला. रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडील आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. रोहिनी खडसे यांच्या घरी पोलिस पोहचले आहेत. तेथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

<div class="paragraphs"><p>Rohini Khadse</p></div>
खडसेंकडून माझ्या जीवाला धोका ; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

समोरची काच फोडण्यात आल्याने रोहिणी खडसे थोडक्यात बचावल्या आहेत. राजकीय डावपेचांतूनच हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापासून शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील व खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

रोहिणी खडसे-खेलवलकर चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळी, मुक्ताईनगर येथे येत होत्या. त्यावेळी सुतगिरणी जवळ अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना दुखापत झाली नसून त्यांच्या गाडीवर रॅाडने हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलिस घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा बॅंकेच्या विद्यामान संचालिका आहेत.

<div class="paragraphs"><p>Rohini Khadse</p></div>
खडसेंच्या धमकीबाबत अजित पवार थेट चंद्रकांत पाटलांनाच विचारणार

हल्लेखोराचा तपास करुन कारवाई करा : चाकणकर

खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच अशा प्रकारचा हल्ला करणारे हल्लेखोर सुटता कामा नयेत, असेही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी जळगाव पोलिस अधीक्षक यांच्याकडे हल्लेखोरांचा तपास करुन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com