Rohit Nikam Join BJP:  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Nikam Join BJP: रोहित निकम भाजपात प्रवेश करणार; अॅड. उज्वल निकमांशी आहे जवळचा संबंध

कैलास शिंदे

Rohit Nikam Will Join BJP : जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे संस्थापक ,माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू व विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांचे पुतणे जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम सहकार,शिक्षण व सामाजिक क्षेत्रासोबत आता राजकारणात सक्रिय होत असून मंगळवार (ता.२७) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थिीतीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे निकम परिवारातील तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय होत आहे.

रोहित निकम हे शिक्षण व सामाजिक आणि सहकार क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी बी.कॉम एम.बी.ए केले आहे. असून योग सायन्समध्ये एम.ए.केले आहे. जळगावात (Jalgaon) त्यांची ‘सॉप्टएड’ ही अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. त्या माध्यमातून विदयार्थ्यांना शिक्षण व स्टार्टअप मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे अनेकांना व्यवसायात तसेच नोकरीतही संधी मिळाली आली. सहकार क्षेत्रातही त्याचे कार्य आहे.

जळगाव जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे ते संचालक, तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक ‘कृभको’मुबंई चे ते सदस्य आहेत.तसेच इतर सहकार संस्थावर ते सदस्य म्हणून कार्य करीत आहेत.त्यांच्या मातोश्री शैलजा दिलीप निकम या जिल्हा बँकेच्या संचालक आहेत. काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या आहेत. वडिल दिलीप निकम हे प्रगतीशील शेतकरी आहेत. तर काका ॲड.उज्वल निकम हे प्रतिथयश राज्याचे विशेष सरकारी वकिल आहेत.

आजोबा बॅरिस्टर देवराम निकम यांनी जळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्राचा पाया रोवला तसेच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोठे कार्य आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची त्यांनी १९५४ ते १९६७ या काळात धुरा वाहिली, सन १९६२ ते १९६७ मध्ये ते चोपडा तालुक्याचे आमदार म्हणून प्रचंड मतानी निवडून आले.पश्‍चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळावर त्यांनी १९५५ ते १९५९ पर्यत कार्य केले प्रत्येक जिल्ह्यात सहकार प्रशिक्षण कंद्राची स्थापना त्यानी केली. (Adv. Ujwal Nikam News)

जिल्ह्यात विविध सहकारी संस्थाच्या स्थापनकेल्या. केळीपासून पावडर बनविण्याचा कारखान सहकार माध्यमातून त्यांनी सुरू केला होता. मात्र मार्केटींगच्या अडचणीमुळ तोपुढे चालू शकला नाही.जिल्हा बँक चेअरमन, भूविकास बँकेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले.याच परिवारातील तिसरी पिढीचे रोहित निकम हे आता राजकरणात सक्रिय होत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते मंगळवार (ता.२७) रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. (Maharashtra Politics)

पक्षाच्या माध्यमातून कार्य करून जिल्ह्याचा विकास करण्याचे त्याचे ध्येय आहे. जळगावात शैक्षणिक विशेषत: संगणकीय क्षेत्रात त्यांचा वीस वर्षाचा अनुभव असल्याने युवकांना आगामी काळात रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात विशेषत जळगावात ‘आय टी हब’ निर्माण करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय शेतकरी कुंटूबातील असल्यामुळे शेती क्षेत्राच्या प्रश्‍नाची जाण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT