BJP Ram Shinde vs Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Ram Shinde vs Rohit Pawar : राम शिंदेंनी रोहित पवारांची आमदारकी आणली अडचणीत; न्यायालयाची नोटीस...

BJP Ram Shinde Rohit Pawar MLA Karjat Jamkhed constituency Aurangabad High Court : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील रोहित पवार यांच्या आमदारकीविरोधात भाजप आमदार राम शिंदे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics News : भाजप विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष आता कोर्टाच्या पायरीवर पोचला आहे.

रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला म्हणून राम शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत, आमदार रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे.

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात, भाजपचे (BJP) राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांच्या चुरशीची लढत झाली. या लढतीत रोहित पवार यांचा 622 मतांनी विजय झाला.

भाजपच्या राम शिंदे यांनी या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने 27 फेब्रुवारीला राम शिंदे यांची बाजू ऐकून घेतली. यानंतर न्यायालायने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह इतरांना नोटीस बजावली आहे.

राम शिंदेंची याचिका

राम शिंदे यांनी याचिकेत रोहित पवार यांनी नामनिर्देशन पत्र चुकीच्या पद्धतीने स्वीकारण्यात आले होते. तसेच निवडणुकीत रोहित पवार यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी राम शिंदे नावाचे उमेदवार उभे केले. तसेच मतदान मिळवण्यासाठी पैशांचा वापर केला, यामुळे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951च्या तरतुदीचे उल्लंघन झाले आहे.

पवारांची आमदारकी रद्द व्हावी

रोहित पवार मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले बारामती अँग्रो कंपनीचे राज्य सरकारच्या वीज वितरण कंपनीसोबत करार आहेत. त्यामुळे ते निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत. त्यामुळे रोहित पवार यांची आमदारकी रद्द व्हावी, अशी मागणी राम शिंदे यांनी याचिकेत केली आहे.

पुढची सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राम शिंदे यांच्या याचिकेची दखल घेतली असून, आमदार रोहित पवार आणि इतरांना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी 27 मार्चला होणार असल्याची माहिती, याचिकाकर्त्याचे वकील राजेंद्र देशमुख यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT