Guardian Minister : अमित शाहांनी 'नाशिक'चा तर फडणवीसांनी 'रायगड'चा तिढा सोडवला? मोठी राजकीय घडामोड

Maharashtra CM Devendra Fadnavis DCM Eknath Shinde Ministers Bharat Gogawale Aditi Tatkare Raigad district : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर तोडगा काढण्यासाठी सीएम देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी ठरणार का?
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Raigad Tour : महायुतीमध्ये पालकमंत्रिपदाचा तिढ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा रायगड दौरा चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांना एकाच वाहन घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला प्रवास चर्चेत आला आहे.

नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी चुटकीसरशी मार्गी लावला. त्याचपद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवतील का? याकडे आता लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज रायगड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्याबरोबर शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहे. या दोघांनी सुरवातीला महाड इथल्या चवदार तळ्याला भेट दिली. यावेळी दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. या चर्चेचा केंद्रबिंदु रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे सांगितले जाते. यावेळी तिथं मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis
Beed Santosh Deshmukh Murder : 'आका'वर मेहेरनजर? वाल्मिक कराड असलेल्या कारागृहातील CCTV बंद, देशमुख कुटुंबियांचा संशय बळावला

यानंतर पुढील कार्यक्रमासाठी फडणवीस स्वतःच्या वाहनातून पुढे निघाले असताना, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना बरोबर घेतले. आदित्य तटकरे या वाहनाच्या पुढच्या आसनावर बसल्या होत्या. तर फडणवीस, शिंदे आणि गोगावले हे मागच्या आसनावर बसले होते.

CM Devendra Fadnavis
Top Ten News : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबतच छेडछाड, पुण्याला बदनाम केलं म्हणता.., -वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

मंत्री गोगावले आक्रमक

महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा चांगलाच गाजला. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. महाडमध्ये आंदोलन देखील झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगडसह नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती.

फडणवीसांची अजिदादांना पसंती?

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदेंचा की, अजित पवार यांचा पालकमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकमध्ये भाजपचा पालकमंत्री

दरम्यान, नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे. तिथं भाजपकडून मंत्री गिरीश महाजन यांचे पालकमंत्रिपद निश्चित मानले जात आहे. दोन दिवसापूर्वी त्यावर तोडगा निघाला आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तो वाद चुटकीसरशी मिटवला. त्याचबरोबर गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये पालकमंत्रिपदाचा बॅनर देखील झळकू लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com