Rohit Pawar Vs Sujay Vikhe Sarakarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar Vs Sujay Vikhe : 'जास्त अहंकार दाखवू नका, नाहीतर...' रोहित पवारांचं सुजय विखेंना उद्देशून विधान!

Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : सुजय विखेंनी निलेश लंके यांच्यावर टीका करताना केलेल्या विधानास रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Mayur Ratnaparkhe

'मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही.' असं वक्तव्य भाजप खासदार सुजय विखेंनी यांनी केले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना सुजय विखेंवर टीका केली आहे.

रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले, "पार्लमेंट मध्ये नागरिकांचे समस्या कोणत्याही भाषेमध्ये मांडता याव्यात त्याला भाषेची मर्यादा नाही त्यामुळे भाषेचे मुद्दे उपस्थित करून लोकांचे मुद्दे बाजूला करत असाल तर हे योग्य नाही. असे म्हणत जास्त अहंकार दाखवू नका नाहीतर तुमचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे खासदार सुजय विखे विरुद्ध शरद पवार गटाचे नीलेश लंके लढत होत आहे. एकमेकांना लक्ष्य करण्याची संधी दोन्ही उमेदवार सोडत नाहीत. नीलेश लंकेंनी माझ्यासारखे इंग्रजी बोलावे. हवे तर महिनाभर पाठांतर करावे. जर ते इंग्रजीत फाडफाड बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं चॅलेंज सुजय विखे यांनी लंकेंना दिले. त्याला लंके यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सुजय विखे (Sujay Vikhe) श्रीमंत घरातील आहेत. ते माझ्यासारख्या गरीब उमेदवारीचा टिंगल करत आहेत. ही त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे, असे प्रत्युत्तर नीलेश लंके यांनी दिले. तसेच ही लढाई श्रीमंत विरुद्ध गरीब असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.

तसेच,लंके (Nilesh Lanke) म्हणाले, मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही. एका बाजूला सांगायचे की जे सक्षम आहे त्यांनी राजकारणात यावे. आणि दुसऱ्या बाजूला टिंगल करायची. त्यापेक्षा पाच वर्षांत काय काम केले त्यावर बोला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT