Nagar: नगर दक्षिणमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून (Sharad Pawar) नीलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने निलेश लंके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लंके हे थेट संगमनेर येथे गेले. त्यांनी विखे पाटलांचे राजकीय कट्टर विरोधक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची (nilesh lanke meet balasaheb thorat) भेट घेतली.
थोरातांच्या भेटीनंतर नीलेश लंके म्हणाले, "राज्यातील सुसंस्कृत नेता म्हणून ओळख असलेल्या बाळासाहेब थोरातांची भेट घेतली. निवडणुकीला सामोरे कसं जायचं याचा मार्गदर्शन घेतले. विखेंबाबत नगर दक्षिणची जनता निर्णय घेईल,"
"नीलेश लंके हा छोटा कार्यकर्ता असला तरी फार गुणी असून सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा हा कार्यकर्ता आहे. नगर दक्षिणची लढाई ही श्रीमंत विरुद्ध गरिबी अशी असून यात निलेश लंके विजय होतील," असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेर शहरातील सुदर्शन या निवासस्थानी मध्यरात्री थोरात आणि लंके यांची भेट झाली. लंके यांनी थोरातांचे आशीर्वाद घेतले. यानंतर दोघांमध्ये जवळपास दीड तास प्रदीर्घ चर्चा झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याविरोधात कोण असेल, याची चर्चा होती.नीलेश लंके (Nilesh Lanke)यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर चित्र काहीसे स्पष्ट झाले होते. लंके यांनी पारनेरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळावा घेऊन शरद पवार यांच्याबरोबर जात लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
मेळाव्यातून लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर जोरदार टीका केली. "विखे पिता-पुत्रांच्या दडपशाही आणि यंत्रणेविरोधात आपण शरद पवार यांच्याबरोबर आहोत," असे सांगून निवडणुकीच्या रिंगणात आल्याचे लंकेंनी जाहीर केली. लंकेंनी या वेळी विखे पिता-पुत्रावर जोरदार टीका केली.
यावर सुजय विखेंनी जशास-तसे प्रत्युत्तर दिले आहे. सुजय विखे म्हणाले, "निवडणुकीमध्ये कोणी ना कोणी उमेदवार समोर येणारच आहे. आम्ही निवडणुकीची तयारी खूप अगोदरपासून सुरू केली होती. जनतेपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांचे पुस्तक आम्ही ठेवणार आहोत. लंकेंनी केलेल्या टीकेला उत्तर नक्कीच दिले जाईल. मात्र, ते उत्तर सभेमध्ये दिले जाईल. आता सध्या माझे कार्यकर्ते उत्तर देण्यात सक्षम आहेत,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.