Prakash-Londhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime: धक्कादायक; आरपीआय नेता प्रकाश लोंढे वसुल करीत होता प्रोटेक्शन मनी?, साथीदारांवर नवा गुन्हा दाखल!

RPI leader Prakash Londhe's problems increased, he was getting protection money,The law has been unleashed on the gang-पोलिसांच्या तपासात मिळाली धक्कादायक माहिती, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याला बिअर बारकडून मिळत होता प्रोटेक्शन मनी

सरकारनामा ब्युरो

Prakash Londhe News: आरपीआय नेता प्रकाश लोंढे यांच्या गुन्हेगारीचे अनेक प्रकार उघड होत आहेत. ाजी होती. त्यासाठी वसुलीचा वेगळाच फंडा त्याने सुरू केला होता.

आरपीआय माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या पीएल ग्रुप या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत. सध्या माजी नगरसेवक लोंढे अटकेत आहेत. तपासातून रोज नवी माहिती पुढे येत आहे. यानिमित्ताने त्याची राजकीय नाकेबंदी झाली आहे.

आरपीआयचा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या टोळीतील संतोष शेट्टी पवार उर्फ जल्लाद याचा नवा कारनामा पुढे आला आहे. व्यवसायिकाला मारहाण करून त्याची गाडी हिसकावण्यात आली. गाडी परत हवी असल्यास चार लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

यासंदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात धीरज शर्मा आणि त्याचा भाऊ मनीष शर्मा याने तक्रार केली आहे. त्यानुसार बेदम मारहाण करून गाडी पळवली. त्यासाठी खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष शेट्टी पवार उर्फ जल्लाद हा लोंढे साठी गुन्हेगारी करत होता. त्यात हॉटेल आणि बार मध्ये मारामाऱ्या करून दहशत निर्माण केली जात होती. त्यानंतर त्यानंतर हे प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी दरमहा प्रोटेक्शन मनीची मागणी करण्यात येत होती. हे सर्व संतोष शेट्टी पवार करीत होता.

सातपूर येथील बहुचर्चित गोळीबार प्रकरणातही हाच फंडा वापरण्यात आला. संबंधित हॉटेल बिपिन पटेल आणि संजय शर्मा चालवीत होते. त्यांच्याकडे भांडण मिटविण्यासाठी दहा टक्के भागीदारीची मागणी करण्यात आली होती.

या संदर्भात आरपीआय नेता प्रकाश लोंढे यांच्या गॅंग विरोधात कायद्याचा वरवंटा फिरला आहे. पोलीस तपासात अनेक धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. गुन्हेगारी टोळी चालवून शहरात दहशत निर्माण केली जात होती. त्या माध्यमातून खंडणी आणि प्रोटेक्शन मध्ये वसुलीचा व्यवसाय तेजीत होता. आता मात्र श्री लोंढे पोलिसांच्या धसक्याने चांगलेच अडचणीत आले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT