Congress vs BJP RSS : देशात भयानक स्थिती असून, त्यावरून RSS, भाजप आणि निवडणूक आयोगावर, काँग्रेसचे माजी मंत्री के. सी. पाडवी यांनी जोरदार निशाणा साधला. भाजपच्या सत्ताकाळात देशात भयानक स्थिती असून, पाकिस्तानसारखी अनागोंदीच्या उंबरठ्यावर भारत आहे.
"आरएसएस आणि भाजपच्या रणनीतीवर देश असाच चालत राहिल्यास भारत-पाकिस्तानमध्ये काहीच फरक राहणार नाही. देशात काँग्रेसची सत्ता हवी, अशी सर्वसामान्य मागणी करू लागला आहे. भाजपच्या उच्चाटनाची सुरवात देशाच्या ग्रामीण भागातून होणार, आदिवासी करणार," असा विश्वास के. सी. पाडवी यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे के. सी. पाडवी यांनी नंदूरबार नगरपालिकेत मिळालेल्या यशानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं आहे. यावेळी त्यांनी RSS, भाजप आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार टिका केली. निवडणूक आयोग हा भाजपचा कार्यकर्ता झाला आहे, अशा शब्दात प्रहार केला.
काँग्रेसचे (Congress) के. सी. पाडवी म्हणाले, या देशात लोकशाही राहणार का नाही? सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांची निवड सत्तेत असलेला, पक्ष करणार. तसंच राज्य निवडणूक आयोग हा भाजपाच्या कार्यकर्त्यासारखा काम करत आहेत. यामुळे सत्तेत असलेला पक्ष हा हुकूमशाही सारखा वागत आहे. अशी भयानक परिस्थिती या देशात निर्माण झाली आहे.
'भारत-पाकिस्तानमध्ये काहीही फरक राहणार नाही, पाकिस्तानामध्ये जशी अनागोंदी सुरू आहे. जर तुम्ही आरएसएस अन् भाजपच्या रणनीतीवर चालत राहिल्यास तिच परिस्थिती भारत होईल. काँग्रेस हाच पक्ष सर्वसामान्याचा भला करणारा आहे. भाजप आजही आदिवासींना वनवासी म्हणतो, आज या देशात आदिवासींची काय अवस्था आहे. त्यामुळे आदिवासींना शिक्षण घेऊन द्या. मात्र भाजप राज्यघटना संपून आदिवासींना संपवणार का? अंगठा कापणाऱ्यांनी आम्हाला जास्ती शिकवू नाहीत. राज्यघटनेने आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत, ते घेऊन आम्ही प्रगती करणार,' असेही माजी मंत्री के. सी. पाडवी यांनी म्हटले.
'नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार, ज्याप्रमाणे नगरपालिकेत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. ग्रामीण भागातील जनता भाजपला नाकारत आहे. काँग्रेस साथ देत आहे. नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून निर्माण झाली, तरी देखील नेते काँग्रेसला सोडून कधीही गेलेत नाहीत,' असेही के. सी. पाडवी यांनी सांगितले.
'जिल्हा परिषदेनंतर पुन्हा एकदा विधानसभेत देखील काँग्रेसची सत्ता येईल. देशात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार आहे. हे हुकुमशाहीचे दिवस संपणार आहे. काँग्रेसबरोबर देशातील जनता जोडली जात आहे. सर्वसामान्यांपासून ते गरिबापर्यंत जोडले जात आहे. पण भाजपच्या उच्चाटनाला देशाच्या ग्रामीण भागातून सुरूवात होणार असून, त्यात आदिवासी पुढे असतील,' असा विश्वास के.सी पाडवी यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.