Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinnar APMC election : आमदार कोकाटेंच्या सत्तेला धक्का; वाजे, कोकाटेंना समान जागा!

बाजार समितीच्या निवडणुकीत कोकाटे आणि वाजे गटाला समसमान जागा मिळाल्या.

Sampat Devgire

Manikrao Kokate & Waje group tally : सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला. गेल्या पंधरा वर्षांची त्यांची सत्ता शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाच्या नवख्या उमेदवारांनी बरोबरीत केली. वाजे व कोकाटे गटाला समसमान नऊ जागा मिळाल्याने दोन्ही नेत्यांनी फेरमतमोजणीचा अर्ज दिला आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांत तणावाचे वातावरण होते. (Sinnar APMC election Both Kokate & Waje panel got equal seats)

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेल आणि शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलला समसमान नऊ जागा मिळाल्या. हा गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या कोकाटे यांना मोठा राजकीय धक्का आहे. निकालानंतर नेत्यांनी फेरमतमोजणीचा अर्ज देण्यात आला. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर तणाव होता.

या निवडणुकीत सोसायटी गटात आठ, हमाल मापारी गटात एक तर वाजे गटाला सोसायटी गटात तीन, ग्रामपंचायत गटात चार व व्यापारी गटात दोन अशा समसमान नऊ जागा मिळाल्या. आज सकाळी मतदानास सुरवात झाली. दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी मतदार ने आण करण्यासाठी व्यवस्था केली होती. त्यामुळे मतदान केंद्रावर मतमोजणी दरम्यान चुरस होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार असे, कंसात मिळालेली मते, सोयायटी मतदार संघ : सर्वसाधारण गट- शशिकांत गाडे (६०१), भाऊसाहेब खाडे (६०३), अनिल शेळके (५९०), रविंन्द्र शिंदे (५८९), विनायक घुमरे (५८९), महिला राखीव : सिंधुबाई कोकाटे (६२३), सुरेखा पांगारकर (६१६), ओबीसी : संजय खैरनार (६२९) आणि नवनाथ नेहे (२१९).

वाजे गटाचे विजयी उमेदवार

शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलचे उमेदवार असे, सोसायटी मतदार संघ- सर्वसाधारण : शरद थोरात(५९७), जालिंदर थोरात (५९७), विमुक्त जाती भटक्या जमाती : नवनाथ घुगे (६२५), ग्रामपंचायत मतदार संघ : सर्वसाधारण : रवींद्र पवार ( ५०३), श्रीकृष्ण घुमरे (५३२), अनुसूचित जाती जमाती : गणेश घोलप (५४७), आर्थिक दुर्बल : प्रकाश तुपे (५५७), व्यापारी मतदार संघ : सुनील चकोर (९४), रवींद्र शेळके (७९)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT