Deola APMC election : भाजप-राष्ट्रावादीची भाऊबंद संपली पण कार्यकर्ते दुरावले?

देवळा बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र आलेले कट्टर शत्रु जिंकले.
BJP`s Keda Aher & NCP`s Yogesh Aher
BJP`s Keda Aher & NCP`s Yogesh AherSarkarnama
Published on
Updated on

BJP, NCP allince win & lost: देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल ने १८ पैकी १७ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. तर आपल्याच नेत्यांविरोधात लोकमान्य शेतकरी पॅनल ने तीन जागा लढवत नेत्यांना चांगलाच घाम फोडला. त्यामुळे भाऊबंदकी संपवण्याच्या नादात आहेर कुटूंबाला चांगलाच शॉक दिला.(Party Followers create big chalange to leaders)

देवळा (Nashik) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) भाजपचे (BJP) जिल्हा अध्यक्ष केदा आहेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते योगेश आहेर यांनी राजकीय लाभाचा विचार करून आघाडी केली. त्यात ते यशस्वी झाले.

BJP`s Keda Aher & NCP`s Yogesh Aher
Nashik APMC Election: पिंगळे, चुंभळे लढतीत प्रचाराच शेवटपर्यंत दहशतीची चर्चा!

कार्यकर्त्यांना ते पसंत पडले नाही असा मतदानाचा काल दिसतो. कदाचीत त्यामुळेच हमाल तोलारी गटात दोन्ही उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी करत एकमेकांविरुद्ध लढत दिली.

आज बाजार समितीच्या मतदानात १०४३ पैकी १०१७ मतदारांनी मतदान केल्याने ९७.५० टक्के मतदान झाले. मतदानानंतर लगेचच झालेल्या मतमोजणीत शेतकरी विकास पॅनेलच्या बाजूने निकाल लागल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली.

BJP`s Keda Aher & NCP`s Yogesh Aher
Nashik Income Tax Raid: तीन हजार कोटींच्या `आयकर` धाडींशी संबंधित नाशिकचा नेता कोण?

या निवडणुकीत पत्रकार संघाच्या वतीने सर्वपक्षीय उमेदवारांना एकत्रित आणत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला असता माजी सभापती केदा आहेर व माजी सभापती योगेश आहेर यांच्या माध्यमातून १८ पैकी आठ जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले होते. उर्वरित दहा जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले. त्यात सोसायटी गटाच्या सात जागांसाठी १३ उमेदवार तर व्यापारी गटात २ जागांसाठी ३ आणि हमाल मापारी गटासाठी समोरासमोर लढत झाली.

भाजपा व महाविकास आघाडी यांनी शेतकरी विकास पॅनल ची निर्मिती करून सोसायटी गटात सात व व्यापारी गटात दोन असे नऊ उमेदवार रिंगणात उतरवले होते. याच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सोसायटी गटाच्या सात जागांसाठी तीन उमेदवारांनी एकत्रित येत लोकमान्य शेतकरी पॅनल उभे केले होते. इतर तीन उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी केली असली तरी शेतकरी विकास पॅनलला जाहीर पाठिंबा दिला होता.

BJP`s Keda Aher & NCP`s Yogesh Aher
CPI News : आता ‘भाजप हटाव’ हाच खरा पर्याय!

शेतकरी विकास पॅनल कडे मतदारांचे संख्याबळ जास्त होते, मात्र एका जागेचा तिढा न सुटल्याने कार्यकर्त्यांनीच नेत्यांच्या विरुद्ध बंड पुकारून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात भाग पाडले. दरम्यान आज मतदान प्रक्रियेत सोसायटी गटातील ५१० पैकी ५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर व्यापारी मतदारसंघात ४३७ पैकी ४२३ व हमाल व्यापारी मध्ये ९६ पैकी ९४ मतदारांनी मतदान केले.

दिवसभर झालेल्या मतदान प्रक्रियेच्या वेळी सकाळपासून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदान केंद्राजवळ ठाण मांडून होते. लोकमान्य शेतकरी पॅनलच्या तीन उमेदवारांनी आव्हान उभे केल्याने शेतकरी विकास पॅनल चांगलीच कसरत करावी लागली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी येथील मतदान केंद्र यांना भेट देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

BJP`s Keda Aher & NCP`s Yogesh Aher
Shivsena Nashik news : शिंदे गटाच्या आक्रमकतेने भाजप आमदार अस्वस्थ!

मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. सोसायटी गटातील शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, शिवाजी दोधा आहिरे - ३२१, योगेश शांताराम आहेर - ४०५ अभिजित पंडितराव निकम- २८७, भाऊसाहेब निंबा पगार- ३७३,अभिमन वसंत पवार - ३५८, शिवाजीराव भिका पवार - ३३६ विजय जिभाऊ सोनवणे - ३६२

व्यापारी गट- निंबा वसंत धामणे - ३२९, संजय दादाजी शिंदे - ३६५, हमाल मापारी गट- भाऊराव बाबुराव नवले- ५७.

दरम्यान बिनविरोध झालेल्या उमेदवारांची नावे अशी, सोसायटी गट- (महिला राखीव) धनश्री केदा आहेर व विशाखा दीपक पवार, इतर मागास वर्ग- दिलीप लालजी पाटील, विजा-भज गटात दीपक काशिनाथ बच्छाव, ग्रामपंचायत गटात रेश्मा रमेश महाजन, शाहू गंगाधर शिरसाठ, भास्कर बाबुराव माळी तर आर्थिक दुर्बल गटात शीतल योगेश गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com