Ashok Kharat case SIT investigation details: विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेली जवळीक रुपाली चाकणकर यांना चांगलीच भोवली आहे. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. चाकणकर यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवले जावे अशी मागणी पुढे आली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी रुपाली चाकणकर यांचे नाव जोडले गेल्याने पक्षाची प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत रूपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन दूर करावे. त्यांचा राजीनामा घेतला जावा अशी आग्रही मागणी नाशिकच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केली.
रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी काही भूमिका घेण्यापूर्वीच नाशिकमधून आक्रमक भूमिका घेण्यात आली. चाकणकरांच्या नावाला पक्षातून पहिला विरोध नाशिकमधून झाला. चाकणकर यांना पदावरुन हटवावे या मागणीचे पत्र प्रेरणा बलकवडे यांनी पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठविले.
दरम्यान प्रेरणा बलकवडे यांना राष्ट्रवादीच्या नाशिकमधील मोठ्या नेत्याचा आशीर्वाद असल्याचं बोललं जात आहे. हा नेता राष्ट्रवादीचा मोठा नेता असून मंत्री देखील आहे. या मंत्र्यांशी प्रेरणा बलकवडे यांची चांगली जवळीक आहे. बलकवडे या त्यांच्या विश्वासू व जवळच्या कार्यकर्त्या आहे. बलकवडे यांच्या आडून या मंत्र्यानेच चाकणकरांना हटवायला फिल्डींग लावल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीमध्ये सध्या दोन गट पडल्याचे चित्र आहे. सुनिल तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात एक दुसरा गट सक्रीय आहे. चाकणकर या तटकरे व पटेल यांच्या गटातील आहेत. त्यामुळे चाकणकर यांना या पदावरुन हटवण्यासाठी दुसरा गट सक्रीय झाल्याचे दिसत आहे.
त्याच रणनितीचा भाग म्हणून नाशिकमधून चाकणकर यांना हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली गेली आहे. त्यासाठी बलकवडे यांच्यामागे राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्याचे पाठबळ असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान या सगळ्या घडामोडी पाहाता रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकमत झाल्याचे वृत्त आहे. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत राजीनाम्यावर चर्चा झाली. चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आमदारांनी देखील बैठकीत केली. त्यामुळे आता चाकणकर यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.