Nashik News : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. यासाठी आज (दि. १०) रोजी सकाळीच त्या पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या होत्या. यावेळी चाकणकरांसोबत त्यांचे वकीलही होते.
नाशिकमध्ये चौकशीसाठी दाखल झाल्यानंतर यावेळी त्यांना माध्यमांनी गराडा घातला. त्यामुळे त्यांनी आधी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांच्या प्रश्नांना त्यांनी अगदी शांतपणे उत्तरे दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, SIT पथकाकडून याप्रकरणाचा जो तपास सुरू आहे, त्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील आणि त्यांना काही उत्तर हवे असतील तर ते देण्यासाठी मी आज नाशिकमध्ये आलेली आहे. एसआयटीला तपासात मी पूर्णपणे सहकार्य करेल, ती माझी जबाबदारी आहे. तपासाला सामोरे जात असताना जी जी मदत पोलिसांना व तपास अधिकाऱ्यांना हवी असेल त्यांना मी ती करेल असं त्यांनी स्पष्ट केलं.
कोण काय बोलतंय याची मला कल्पना नाही. पंरतु तपास पूर्ण झाल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, समता पतसंस्था आणि जगदंबा पतसंस्थेत असलेल्या अशोक खरातच्या बँक खात्यांशी तुमचा संबंध काय? याबाबत विचारले असता ती सर्व खाती बनावट आहेत असा दावा त्यांनी केला. त्याचा अहवाल समोर येईल असं चाकणकर म्हणाल्या.
भोंदू अशोक खरात यांच्याशी संबंधावर आणि आरोपावर विचारले असता त्यावर चाकणकर म्हणाल्या, मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल. त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील. तर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची आपल्याला कल्पना नाही असे चाकणकर म्हणाल्या.
त्यानंतर त्या चौकशीसाठी नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अॅकडमी येथे पोहचल्या. तिथे आतमध्ये एका कार्यालयात त्यांची चौकशी सुरु आहे. माध्यमांनाही आतमध्ये प्रवेश नव्हता. त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्या काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पगार कुटुंबियांचे सांत्वन
एसआयटीसमोर जाण्यापूर्वी रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार यांच्या निवासस्थानी भेट देऊन पगार कुटुंबियांचे सांत्वन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.