Rupali Chakankar SIT Inquiry : भोंदू अशोक खरातमुळे अडचणीत सापडलेल्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज एसआयटीसमोर हजर राहणार आहेत.
नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात रूपाली चाकणकर यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी रूपाली चाकणकर सकाळीच पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या आहेत.
तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना डिवचलं आहे. अंधारे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी, 'रूपाली चाकणकर हजर आहे सर...!' असं लिहित चाकणकरांची खिल्ली उडवली आहे.
अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचं नाव आल्यापासून सुषमा अंधारे यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं आहे. चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसह त्यांची चौकशी करावी, अशी सातत्याने त्या मागणी करत आहेत.
अशातच अखेर चाकणकर एसआयटीपुढे उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अंधारे यांनी चाकणकरणांना डिवचल्याचं दिसत आहे. दरम्यान, एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या स्वत: आज रूपाली चाकणकर यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर चाकणकर यांच्यासोबत त्यांच्या महिला वकील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.