Sachin Pingle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Nashik News : सचिन पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात दाखल!

Sachin Pingle joins NCP Sharad Pawar Group-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटातील स्पर्धेमुळे सध्या कोण कोणत्या गटात याबाबत गोंधळ आहे.

Sampat Devgire

Nashik NCP Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर बहुतांश सत्तास्थांनांवरील पदाधिकारी अजित पवार गटात गेले असताना पक्षाचे युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन पिंगळे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. (NCP Sharad Pawar Group will focus on Ideology)

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) (शरद पवार गट) (Sharad Pawar) नाशिक (Nashik) शहर व जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी विचारधारेवर भर दिला आहे. त्यादृष्टीने अनेक प्रमुख पदाधिकारी या पक्षाकडे आकर्षित होत आहेत.

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यावर एक मोठा गट राज्यातील भाजपच्या सत्तेत सहभागी झाला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे भाजपने सत्तेच्या माध्यमातून त्रास दिलेल्या सहकारी व अन्य संस्थांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सत्तेच्या सावलीसाठी अजित पवार गटाबरोबर गेले.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांच्या दौऱ्यात पक्षाच्या युवक शाखेचे माजी अध्यक्ष आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक संचिन पिंगळे यांनी प्रवेश केला.

सध्या राज्यात राजकीय विचारधारेचा गोंधळ आहे. त्यामुळे जनता या सत्तातुर राजकारणाबाबत अक्षरशः संतप्त आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. येथे राजश्री फुले, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे नाव घेऊन काही आसुरी सत्ता पक्ष व नेत्यांना सत्ता व तपास यंत्रणांचा धाक दाखवून फोडत आहे. अशा स्थितीत वैचारीक लढा व विचारांवर आधारीत राजकारणासाठी सगळ्यांना आकर्षित करण्यावर शरद पवार गटाने भर दिल्याचे शेख यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्ह्याचे नेते गोकुळ पिंगळे, प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, दत्तात्रय माळोदे, जिल्हाध्यक्ष शाम हिरे, कार्याध्यक्ष गणेश गायधनी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT