Sadhwi sarswatini Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

चिथावणीखोर भाषणामुळे साध्वी सरस्वतीनी अडचणीत येणार?

धुळे येथील सभेत युवकांनी तलवार बाळगावी असा संदेश दिला होता.

Sampat Devgire

धुळे : युवकांनी तलवार (Sword) बाळगावी, तलवार घेऊनच बाहेर पडावे असे चिथावणी (Provocative) देणारे भाषण करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी सरस्वतीनी (Sadhvi Sarswatini) यांच्या चौकशी करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वतीनी यांनी रामनवमीच्या निमित्ताने केलेल्या चिथावणीखोर भाषण केले. हे भाषण साम वृत्तवाहिनीने प्रसारित केले. त्यानंतर पोलीस प्रशासनातर्फे या बातमीची दखल घेण्यात आली आहे. आता पोलिस यातील विविध व्यक्तींचा शोध घेत आहे.

साध्वीने हिंदू तरुणांना तलवार बाळगण्याचे आवाहन भर सभेत साध्वी सरस्वती यांनी केले होते. यावेळी त्यांनी अतिशय आक्रमक भाषण केले होते. रामनवमी निमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी विविध संदर्भ देत धार्मिक वाद निर्माण होईल अशी वक्तव्ये केली होती.

या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाषणाची संपूर्ण व्हिडीओ क्लिप पडताळून त्या संदर्भात पडताळणी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे

शहरात विनापरवानगी बाईक रॅली काढणे, जातीय तेढ निर्माण करणारे भाष्य करणे या संदर्भात जवळपास शंभर ते सव्वाशे जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT