Sameer Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sameer Bhujbal Politics: समीर भुजबळ म्हणाले, "नांदगावचे प्रत्येक घर दहशतमुक्त करण्यासाठी माझी उमेदवारी"

Audio of Threats and Abuses by MLA Suhas Kande: शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी धमकी व शिवीगाळ केल्याचा ऑडिओ कार्यकर्त्याने सभेत ऐकवला

Sampat Devgire

Bhujbal Vs Kande News: नांदगाव विधानसभा मतदार संघातून आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात माजी खासदार समीर भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने झालेले शक्ती प्रदर्शन आणि आरोप यातून या निवडणुकीला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत.

माजी खासदार भुजबळ यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन नांदगाव शहरात केले. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे आणि अपक्ष माजी खासदार भुजबळ यांच्यात निवडणुकीच्या आधीच होणारे आरोप आणि घटना पाहता आगामी महिनाभर नांदगाव मतदार संघाचे वातावरण तापणार हे स्पष्ट झाले आहे.

माजी खासदार भुजबळ यांनी आज नांदगाव येथे आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या मिरवणुकीला हजारो महिला आणि मतदार विविध भागातून आले होते. यानिमित्ताने अर्ज दाखल करतानाच माजी खासदार भुजबळ यांनी प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडण्यात यश मिळवले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात विविध समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या भाषणात नांदगाव मतदार संघात सध्या प्रचंड दहशत आहे. सबंध सरकारी यंत्रणा येथील आमदाराच्या सेवेत व्यस्त आहे. नागरिकांच्या प्रश्नांबाबत कोणाला काहीही घेणे देणे नाही. जो कोणी कार्यकर्ता विरोध करील त्याच्यावर पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात.

मतदार संघातील घरोघरी जनता दहशतीखाली वावरत आहे. त्यातून या मतदारसंघाची सुटका करण्याची आवश्यकता असल्याचे मला विविध कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे मी नांदगाव येथून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला, असे माजी खासदार भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी शेखर पगार या कार्यकर्ता भुजबळ यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने आमदार सुहास कांदे यांनी त्यांना फोनवरून केलेली अर्वाच्य शिवीगाळ, धमकी आणि मारहाणीचा इशारा असलेले फोन रेकॉर्डिंग ध्वनीक्षेपकावरून सगळ्यांना ऐकविले. ाया रेकॉर्डिंग मुळे उपस्थित त्यांनी संताप व्यक्त केला

यावेळी माजी खासदार भुजबळ म्हणाले, या मतदारसंघात प्रचंड दहशत आहे. कोणीही निवडणुकीत प्रचार करू शकेल, अशी स्थिती नाही. अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हा उमेदवार बदला असा आग्रह आम्ही महायुतीकडे केला. उमेदवार बदलता येत नसेल तर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सोडा, अशी देखील मागणी केली.

मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या मतदारसंघातील अनेक लोकांनी त्यांच्या व्यथा आणि वेदना माझ्याकडे येऊन मांडल्या. त्यांच्या आग्रहामुळेच मी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्व मतदारांनी आशीर्वाद द्यावा.

मी या मतदारसंघात विकास करेन सामान्यांचे प्रश्न सोडेल आणि मुख्य म्हणजे या मतदारसंघातील दहशत मोडून काढेल यावेळी उपस्थित त्यांनी पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणांचा गजर केला माजी खासदार भुजबळ यांनी,

" मेरा इरादा सियासात का रुख मोडेगा|

याद रख मेरा ये होसला, तेरा गुरुर तोडगा"

असा शेर ऐकवत भाषणाचा समारोप केला.

महायुतीने विद्यमान आमदार कांदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गणेश धात्रक उमेदवारी करीत आहेत. यामध्ये माजी खासदार भुजबळ यांच्या बंडखोरीने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. डॉ रोहन बोरसे हे देखील मराठा महासंघाच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत आहे. या चौरंगी लढतीत कोण बाजी मारतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT