Ajit Pawar : अजित दादांची आमदार दिलीप बनकर यांना उमेदवारी, यतीन कदम यांची होणार कोंडी?

Niphad Assembly Constituency: निफाड मतदारसंघाचे चित्र स्पष्ट, राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार दिलीप बनकर यांना उमेदवारी दिल्याने यतीन कदम यांची कोंडी झाली.
Dilip Bankar & Yatin Kadam
Dilip Bankar & Yatin KadamSarkarnama
Published on
Updated on

Dilip Bankar News: निफाड मतदारसंघात महायुतीचा निर्णय काय होणार? याची उत्सुकता आता संपली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार दिलीप बनकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला.

आमदार दिलीप बनकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची उमेदवारी मिळाली. मात्र ही उमेदवारी मिळताना उपमुख्यमंत्री पवार यांनी आखलेले डावपेच चर्चेचा विषय आहेत. यंदा त्यांनी गेले आठवडाभर दुसरे इच्छुक यतीन कदम यांना चर्चेत गुंतवून ठेवले.

गेल्या निवडणुकीत अपक्ष यतीन कदम शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले. थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बनकर यतीन कदम यांच्यामुळे विजयी झाले होते.

आपले उपद्रवमूल्य आणि मतदारसंघातील स्थान विचारात घेऊन यंदा यतीन कदम यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे उमेदवारीच मागीतली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेच्या निमि्ताने त्यांना गुंतवून ठेवत अक्षरशः कात्रजचा घाट दाखवला आहे.

Dilip Bankar & Yatin Kadam
Uddhav Thackeray: चोपडा मतदारसंघाचा उमेदवार बदला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाठली थेट "मातोश्री"

यंदाच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवार असलेले यतीन कदम भारतीय जनता पक्षात होते. त्यामुळे ते महायुतीचे घटक असल्याने त्यांना उमेदवारी मिळणार का? उमेदवारी कोणतापक्ष देणार? हे गंभीर प्रश्न होते. त्यामुळे त्यांची शेवटच्या क्षणी राजकीय अडचण झाली.

महायुतीच्या जागा वाटपात विद्यमान आमदार दिलीप बनकर हे अजित पवार पक्षात असल्याने नैसर्गिक न्यायाने निफाड मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात त्या पक्षालाच मिळणार हे स्पष्ट होते. त्यामुळे यतीन कदम हे भाजप गेले आणि कोंडीत सापडले, अशी स्थिती होती.

यतीन कदम यांच्याकडे ओझर हे मतांचे पॉकेट आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार अनिल कदम हे देखील ओझरचेच आहेत. माजी आमदार कदम आणि यतीन कदम हे चुलत भाऊ आहेत.

Dilip Bankar & Yatin Kadam
Igatpuri Congress : इगतपुरीमध्ये लकी जाधव यांच्या उमेदवारीचा निषेध, ६५ काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!

त्यामुळे त्यांच्यातील भाऊबंदकी राजकारणात परावर्तित झालेली आहे. त्यात जिंकतो कोण? यापेक्षा पराभव कोणाचा करायचा ह्याला अधिक महत्त्व देण्यात येत असते. या दृष्टीने एक प्रकारे यंदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार बनकर यांना उमेदवारी देत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार अनिल कदम यांच्या मदतीला धावून आले अशी काहीशी स्थिती आहे.

यानिमित्ताने यतीन कदम यांची मात्र व्यवस्थित राजकीय कोंडी करण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी मुरब्बी राजकारण केले. यतीन कदम यांच्या समर्थकांची देखील तशीच भूमिका आहे. त्यामुळे आज त्यांच्या समर्थकांची ओझर येथे बैठक झाली.

या बैठकीत उमेदवारी अर्ज दाखल करायचा. यालंदर्भात भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून पुढील भूमिका घेण्याचे ठरले. येत्या ३ नोव्हेंबरला याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी यापूर्वीच आमदार बनकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असावा, अशा एकंदर घडामोडी आहेत. मात्र यतीन कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यासाठी चर्चेचा घोळ घालण्यात आला. यतीन कदम यांची बाजू मांडण्यासाठी माजी आमदार मंदाकिनी ताई उर्फ माई कदम आणि माजी आमदार बोरस्ते यांनी देखील उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे शिष्टाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com