Bhujbal family campaign Yeola Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yeola Municipal Election : छगन भुजबळ घेतायत विश्रांती, पंकज-समीर लढवताय येवल्याची खिंड.. अख्ख कुटुंब उतरलंय प्रचारात

Bhujbal family campaign Yeola : येवला नगरपालिका निवडणुकीत छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भुजबळ आजारी असल्याने समीर भुजबळांनी निवडणुकीची धूरा हाती घेतली आहे. संपूर्ण भुजबळ कुटुंब प्रचारात उतरलं आहे.

Ganesh Sonawane

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेत असून आराम करत आहेत. त्यामुळे येवला नगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचारापासून ते दूर आहेत.

येवला हा छगन भुजबळ यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे येवला नगरापालिका निवडणुकीत भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव भुजबळांना प्रत्यक्षात प्रचाराच्या रिंगणात उतरता आले नसले तरी भुजबळांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ व मुलगा आमदार पंकज भुजबळ हे येवल्याची खिंड लढवत आहेत.

छगन भुजबळ स्वत:आजारी असले तरी संपूर्ण भुजबळ कुटुंब येवल्यात तळ ठोकून आहे. पुत्र पंकज भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ यांच्यासह भुजबळांच्या दोन्ही सुना विशाखा भुजबळ व डॉ. शेफाली भुजबळ याही निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. विकासाचा भुजबळ पॅटर्न तसेच येवल्याच्या विकासाचा वचननामा जनतेपर्यंत पोचविण्यासाठी शहरातील कानाकोपरा भुजबळ कुटुंब पिंजून काढत आहेत.

येवला नगरापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, रिपाइं आणि घटक पक्षांची युती आहे. नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र लोणारी यांना उमेदवारी दिली आहे. समीर भुजबळ यांच्याकडे नगरपरिषद निवडणूक प्रचाराची धुरा आहे. त्यांच्या मदतीसाठी पत्नी डॉ. शेफाली या देखील प्रचारात सक्रिय असून पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांसह ठिकठिकाणी भेटी देत आहेत.

छगन भुजबळ हे आजारी असले तरी त्यांचे येवल्याकडे विशेष लक्ष आहे. त्यांनी मुंबईतून वचननाम्याचे प्रकाशन केले. हा वचननामा घराघरापर्यंत पोहचवण्याचे काम भुजबळ कुटुंबीय प्रचारातून करत आहेत. भुजळांचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ व त्यांच्या पत्ती विशाखा भुजबळ याही वचननामा घेऊन मतदारांपर्यंत पोहचत आहेत.

येवल्यात एकीकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजपची युती झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना(शिंदे गट)व राष्ट्रवादी(शरद पवार गट)ची युती झाली आहे. समीर भुजबळांनी नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र लोणारी यांना उमेदवारी दिली असून दराडे बंधूंनी रुपेश दराडे यांना उमेदवारी दिली आहे. लोणारी व दराडे असा सामना येवल्यात रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT