Sameer Bhujbal & Suhas Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sameer Bhujbal Politics: सुहास कांदे यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, पोलीस दबावाखाली!

Sameer Bhujbal; police under pressure, should file case against Suhas Kande-माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन आणि दहशत

Sampat Devgire

Bhujbal Vs Kande News: नांदगाव मतदार संघाच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांनी प्रचंड दहशत निर्माण केली. पोलीस यंत्रणा दबावा खाली होती. त्यामुळे आज दिवसभर या मतदारसंघात धुडगूस सुरू होता.

अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनेक तडीपार गुंड मतदानाच्या दिवशी मतदारसंघात दहशत निर्माण करण्यासाठी आणले होते. आमदार कांदे यांनी सर्व कायदे पायदळी तुडवत होते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

पोलीस प्रशासन आणि निवडणूक प्रशासन दोन्हीही सर्व गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करीत होते, असा आरोप भुजबळ यांनी केला. अनेक ठिकाणी पोलिस मुकदर्शक बनले होते. मागणी करूनही आणि उघडपणे सर्व नियमांचे उल्लंघन होत असताना, काहीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत आम्ही निवडणूक संपल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे समीर भुजबळ यांनी सांगितले.

ते म्हणाले, सकाळी मी नांदगाव हून मनमाड कडे जात होतो. यावेळी एका शिक्षण संस्थेच्या परिसरात जवळपास दहा हजार लोक आणून ठेवले होते. त्यांना डांबून ठेवले होते. त्यांच्यासाठी जेवण बनविण्यात येत होते. त्यांच्या वाहतुकीसाठी व्यवस्था करण्यात आली होती. याबाबत पोलिस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही. जे आम्हाला दिसले, ते पोलिसांना का दिसले नाही.

हे सर्व निवडणूक आयोगाच्या आणि आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होते. मी तेथे गेलो असता आमदार कांदे यांनी सर्व यंत्रणा आणि पोलिसांच्या उपस्थितीत प्रचंड दादागिरी केली. मला सगळ्यांच्या समोर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांना असभ्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. हा सर्व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सर्व घडले.

तिथे तातडीने पोलिसांनी स्वतःहून आमदार कांदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. अद्याप अशी कोणतीही कारवाई झालेली नाही. एका तडीपार गुंडाची माहिती पोलिसांना दिली. तडीपार गुंड ऑटोमॅटिक घेऊन मनमाड मध्ये फिरत होता. आम्ही पोलिसांना सर्व माहिती व दाखवून दिले. तरीही पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन लगेच सोडून दिले. याचा अर्थ पोलीस प्रचंड दबावाखाली होते.

आमच्या कार्यकर्त्यांना आणि पोलिंग एजंटला ठिकठिकाणी मारहाण करण्यात आली. त्यांना धमक्या देऊन काढून देण्यात आले. काही ठिकाणी तर मतदान केंद्रात शिरून पोलिंग एजंटला काढून देण्यात आले. हे सर्व कसे घडू शकते? याला जबाबदार कोण? आम्ही नांदगाव मतदार संघ भयमुक्त करण्यासाठी ही निवडणूक लढवत होतो. आमचा तो लढा सुरूच राहील.

आम्ही कोणत्याही दडपशाहीला आणि गुंडगिरीला घाबरणार नाही. नांदगावच्या जनतेला भयमुक्त केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. आमदार कांदे यांना आपला पराभव डोळ्यापुढे दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांनी हे सर्व गैरप्रकार केले आहेत. यातील अनेक गुंडगिरी आणि गैरप्रकार कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेली आहे. माझी मागणी आहे की, पोलिसांनी यावर कारवाई करावी.

____

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT