Assembly election: धक्कादायक; या मतदान केंद्रावर रात्रीही सुरू राहते मतदान, "हे" आहे कारण!

Nashik politics; minister Dada Bhuse, Chhagan Bhujbal and Narhari jhirwal prominent leaders made heavy efforts for voting- नाशिक जिल्ह्यात आज झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अंदाजे सरासरी ६०.११ एवढे मतदान झाले असून गत निवडणुकीच्या तुलनेत त्यात वाढ झाली.
Womens in the que for voting
Womens in the que for votingSarkarnama
Published on
Updated on

Nashik Assembly 2024: विधानसभा निवडणुकीत काही मतदान केंद्र आणि मतदार संघांमध्ये असलेली परंपरा यंदाही कायम राहिली. नाशिक मध्य मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर अद्यापही मतदान सुरू आहे. ते आणखी दोन तास चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे मतदान केंद्र चर्चेचा विषय ठरले.

यंदाच्या निवडणुकीत पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात माणिकराव कोकाटे पाचव्यांदा, देवयानी फरांदे, सीमा हिरे तिसऱ्यांदा, राहुल ढिकले, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, दिलीप बनकर, सुहास कांदे, दिलीप बोरसे, मौलाना मुफ्ती हे दुसऱ्यांदा मतदारांचे कौल घेत आहेत.

Womens in the que for voting
Suhas Kande Politics: नांदगावमध्ये दिवसभर सुरू होते राडे, धमक्या अन् धमक्यांचे सत्र...

आयोगाने सर्व यंत्रणा अतिशय कार्यक्षम सक्रिय केल्याचा दावा होता. प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यात मात्र राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आपल्याला जे करायचे ते व्यवस्थितपणे केले. त्यामुळे मतदानावर `लक्ष्मी दर्शन` आणि अन्य प्रभावांचा परिणाम झाला. निवडणुकीच्या निकालातूनही तो स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

Womens in the que for voting
Sameer Bhujbal Politics: साकोरा गावात संशयावरून समीर भुजबळ समर्थकांची गाडी ग्रामस्थांनी रोखली

नाशिक जिल्ह्यात यंदा ७१ कोटीहून अधिक रोकड तसेच सोने चांदीचे दागिने आणि अन्य मालमत्ता निवडणूक विभागाने जप्त केली. अनेक ठिकाणी तपासणी सुरू होती. अनेक ठिकाणी रात्रीचे छापे घालण्यात आले. मात्र तरीही आज प्रत्यक्ष मतदानात नियमितपणे होणारे सर्व गैरप्रकार सुरळीतपणे झाल्याची चर्चा आहे. याबाबत अनेक ठिकाणी पोलिसांच्या साक्षीनेच हे प्रकार सुरू होते. त्यामुळे यंदाची निवडणूक वेगळी न ठरता मळलेल्या वाटेनेच पुढे गेली.

नाशिक मध्य मतदार संघातील महापालिकेच्या भालेकर शाळा आणि नॅशनल उर्दू स्कूल या ठिकाणी दुपारी मतदान केंद्र ओस पडतात. सायंकाळी साडेचार वाजता किंवा मतदान संपण्याच्या काही वेळ आधी अचानक तेथे मतदारांचे लोंढेंच्या लोंढे दाखल होतात. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहते. यंदाही तोच कित्ता गिरवण्यात आला. अद्यापही नांदगाव, मालेगाव शहरातही अशाच रांगा आहेत. मतदार दिवसभर आपल्याला अपेक्षित असलेले नेते आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या "तीर्थ" आणि "प्रसाद" याची वाट पाहत असतात. ती अपेक्षा पूर्ण झाल्यावरच मतदानाला बाहेर पडतात. नाशिकमध्ये यंदाही तेच घडले. अद्यापही तेथे मतदान सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदा सरासरी ६०.११ टक्के मतदान झाले. ते २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत पाच टक्के अधिक आहे. विशेषतः आदिवासी राखीव मतदारसंघांमध्ये मतदानाचे प्रमाण अधिक दिसून आले. दिंडोरी मतदार संघात ७१.९७, कळवणला ७०.३४ आणि इगतपुरीत ६९.३९ टक्के मतदान झाले. त्या तुलनेत नाशिक शहर आणि मालेगाव शहरात मतदानाचे प्रमाण घसरले.

जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ निहाय सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत अंदाजे ६०.११ टक्के मतदान झाले. मतदार संघनिहाय झालेले मतदान असे (टक्के), नांदगाव ५९.९३, मालेगाव मध्य ६१.५८, मालेगाव बाह्य ५७.५६, बागलाण ५३.८४, कळवण ७०.३५, चांदवड ६५.०१, येवला ६८.६९, सिन्नर ६३.८५, निफाड ६३.२५, दिंडोरी ७१.९७, नाशिक पूर्व ४९.०६, नाशिक मध्य ५१.४९, नाशिक पश्चिम ५०.३९, देवळाली ५५.०८ आणि इगतपुरी ६९.३९ टक्के मतदान झाले आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com