Samruddhi Mahamarg Opening : १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला मोठी भेट मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला होणार असून लोकांच्या सेवेत येणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे समृद्दी महामार्गाच्या तिसऱ्या व शेवटच्या इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटरच्या टप्प्याचे लोकार्पण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे नाशिक ते मुंबई प्रवास अवघ्या तीन तासांवर येणार आहे. तर मुंबई नागपूर अंतर आठ तासांत गाठता येईल.
एमएसआरडीसीने 701 किमी लांबीचा आणि 55 हजार कोटी रुपयांचा निधी खर्चून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. यापैकी ६२५ किलोमीटरचा महामार्ग हा या अगोदरच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता इगतपुरी-आमणे, भिवंडी या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्याच्या लोकार्पणाचा मुहुर्त ठरला आहे. त्यामुळे नाशिक ते मुंबई व नागपूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
एमएसआरडीसी तर्फे उभारण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम या अगोदरच पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र यासाठी मोठा विलंब झाला. अखेरीस इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी खुला होत आहे. 35 मीटर रुंद आणि 6 लेन दुहेरी बोगद्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. इगतपुरी-आमणे, भिवंडी हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना केवळ आठ तासांत नागपूर गाठणे शक्य होणार आहे.
समृद्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण हे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे २०२३ ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. आता समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या व अत्यंत आव्हानात्मक अशा टप्प्याचे लोकार्पण १ मेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
समृद्धी महामार्ग बाबत सांगायचे झाले तर हा सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 701 किमी आहे व याची रुंदी 120 मीटर इतकी आहे. या महामार्गावरून वाहने तब्बल 150 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकणार आहेत. तसेच या महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास सुद्धा विकसित करण्यात आले आहेत.
या महामार्गावर जुळे बोगदे देखील तयार करण्यात आले आहेत. इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.