Devendra Fadnavis : 'नाशिकमध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक दंगल घडवली', देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा कुणावर?

Devendra Fadnavis Alleges Planned Riots in Nashik : नाशिकमधील ही दंगल पूर्वनियोजित कट होता असा संशय बळावला आहे. असे असतानाचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील दंगल सुनियोजित होती असं म्हटलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Riots Update : नाशिकच्या काठे गल्ली सिग्नजवळ असलेला सातपीर दर्गा हे धार्मिक स्थळ हटवण्यावरुन मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री दंगल झाली. दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले. दरम्यान चार दिवस नाशिकमध्ये तणावपूर्ण वातावरण होतं. दरम्यान या भागातील तणाव आता निवाळला आहे. नाशिकमधील ही दंगल पूर्वनियोजित कट होता असा संशय बळावला आहे. असे असतानाचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील दंगली प्रकरणी मोठं विधान केलं आहे.

नाशिकमधील दंगल जाणीवपूर्वक घडवण्यात आली असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड मध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी स्वत: तेथील अतिक्रमण काढून घेण्यात येईल असं पोलिसांना सांगितलं होतं. तसेच अतिक्रमण काढण्याची सुरवातही त्यांनी केली होती. मात्र काही लोकांनी जाणीवपूर्वक विरोध करुन दंगल घडवून आणली असा आरोप फडणवीस यांनी केला. जाणीवपूर्वक काही लोकांनी दंगा करत दगडफेक केली. दंगलीमधील सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान आतापर्यंत नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात दंगलप्रकरणी 1400 ते 1500 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी दगडफेक प्रकरणात एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना रात्री उशीरा अटक केली आहे.

शहरात मनाई आदेश लागू

तसेच नाशिकमध्ये १९ एप्रिल ते ३ मे पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार हे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत शहरात आंदोलन करणे, शस्र घेऊन फिरणे, चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करण्यास मनाई असणार आहे. संवेदनशील भागात जमावबंदीचे आदेश जारी केले गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com