Sandalwood Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पोलिस अधिकाऱ्यांच्या घरात घुसणारा ‘पुष्पा‘ जालन्यात गजाआड

पोलिसांच्या घरातील चंदनाची चोरी करून पालिसांनी दिले होते आव्हान.

Sampat Devgire

नाशिक : विशेष पोलिस महानिरीक्षक (DIG) व कारागृह अधीक्षकांच्या बंगल्यासह कारागृहाची (Jail) सुरक्षा भेदून चंदनाची झाडे तोडीत सुरक्षा व्यवस्थेला चंदन लावणाऱ्या सराईत जावेदखान पठाण याला नाशिक शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. थेट जालना येथे जाऊन गुन्हे शाखेच्या युनिट एकने ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान त्याच्या नातेवाइकांनी कारवाईला विरोध करताना पोलिसांभोवती गोंधळ घातला. परंतु, पोलिसांनी (Police) जोखीम घेत उचलून आणले.

जावेदखान अजीजखान पठाण (रा. कठोर बाजार, भोकरदन, जि. जालना), असे संशयित चंदनचोर ‘पुष्पा’ चे नाव आहे. युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना नाशिकमध्ये शासकीय आस्थापनांच्या सुरक्षा यंत्रणा भेदून चंदन चोरी करणारी टोळी जालन्यातील कठोर बाजार येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक प्रमोद वाघ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षा भेदून चोरट्यांनी चंदनाची पाच झाडे चोरली होती. त्यानंतर चार दिवसांनी चोरट्यांनी परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या गडकरी चौकातील गोदावरी बंगल्याच्या आवारातून १२ हजार रुपयांचे चंदनाचे झाड तोडून चोरून नेले. दोन्ही ठिकाणच्या पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणा भेदून चोरट्यांनी चंदनाची झाड चोरून नेल्याचे समोर आले होते. सातपूर येथील शासकीय आयटीआय जवळील पोस्ट कार्यालयाच्या आवारातूनही चोरट्याने चंदनाचे झाड चोरले होते.

शहर पोलिसांच्या पथकाने कठोर भागात सापळा रचला. त्यात जावेदखान याला अडवत ताब्यात घेत असताना बाजारातील जावेदखानच्या नातेवाइकांसह आप्तस्वकीयांनी पोलिस कारवाईला विरोध करीत गोंधळ घातला. पोलिसांनी युक्तीचा वापर करून जावेदखानला उचलून आणले.

---

अटक केलेला जावेदखान हा सराईत चंदनचोर आहे. उत्तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात चंदनचोरीचे रॅकेट आहे. या सिंडिकेटचा मूळ सूत्रधार कोण आहे. चोरलेल्या चंदनाची कुठे विल्हेवाट लावली जाते, याचा तपास केला जाणार आहे. जावेदखानकडून नाशिकमधील पाच चंदनचोरीचे गुन्हे उघड झाले आहे. आणखी काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात.

-विजय ढमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, युनिट एक

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT