Nashik News : नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेअंतर्गत आजवर नाशिक पोलिसांनी गल्लीबोळातील गुंडच नव्हे तर राजकीय वजन असलेल्या नेत्यांनाही दणका दिला आहे.
आजूनही नाशिक पोलिसांची ही मोहीम तितकीच सक्रीय आहे. संघटित गुन्हेगारी करत शहरात उच्छाद घातलेल्या हर्षद पाटणकर टोळीवर नाशिक पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. टोळीचा मोरक्या हर्षद पाटणकर याच्यासह त्याच्या सहा साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करत नाशिक पोलिस आयुक्तांनी दणका दिला आहे.
टोळीचा मोरक्या हर्षद पाटणकर हा खूनाच्या गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून फरार होता. तसेच त्याच्या साथीदारांवर देखील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. परंतु तो शहरात पुन्हा एकदा सक्रीय झाला होता. अलिकडेच त्याने हनुमानवाडी येथे एका जुन्या वादातून मित्रावरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. दगडफेक आणि धारदार शस्त्रांचा वापर करत एकावर हल्ला केला.
त्यानंतर पाटणकरला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक केली होती. तो सध्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. हर्षद पाटणकरविरुद्ध खूनाचा प्रयत्न, जबर दुखापत, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आता त्याच्या पूर्ण टोळीवर मकोका लावल्याने सराईत गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून शहरातील संघटित गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
पाटणकर हा विविध गुन्हेगारांना सोबत घेत संघटितपणे कट रचून दहशत निर्माण करीत होता. त्याच्यासह टोळीवर बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील काही गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर पोलिसांनी 'मकोका' अंतर्गत प्रस्ताव पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना सादर केला असता, त्यास पोलिस आयुक्तांनी मंजुरी देत कारवाई करण्यात आली.
यांच्यावर लावला मकोका
टोळीचा मोरक्या हर्षद पाटणकर, त्याचे साथीदार महेश सोनवणे ऊर्फ चिमण्या, श्रवण पगारे, प्रदीप शेवाळे, मयूर वानखेडे, मयूर निकम, निखिल जाधव
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.