Ashok Kharat Case: कोर्टात 7 मिनिटात काय घडलं? SIT खरातचा फिरवणार गेम; 'प्लॅन बी' तयार

What Happened in 7 Minutes in Court? SIT Prepares ‘Plan B":खरातला तीन वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, आजही पोलिस त्यांच्या कोठडीची मागणी करतील असे वाटत होते, पण पोलिसांनी न्यायालयात कोठडीची मागणी केली नाही, फक्त सात मिनिटात सुनावणी झाली.
Ashok Kharat case full story
Ashok Kharat case full storySarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat case twist: बोगस अध्यात्मिक गुरु अशोक खरात यांची पोलिस कोठडी आज संपल्यानंतर त्याला नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर त्याला न्यायालयीन कोठडी ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. सात मिनिटाच्या सुनावणीनंतर खरातची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

यापूर्वी खरातला तीन वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, आजही पोलिस त्यांच्या कोठडीची मागणी करतील असे वाटत होते, पण पोलिसांनी न्यायालयात कोठडीची मागणी केली नाही, फक्त सात मिनिटात सुनावणी झाली. कोर्टात आज कुठलाही मोठा युक्तिवाद झाला नाही.

न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरात जरी पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत गेला असला तरी त्यांच्या अडचणी सुटलेल्या नाहीत, कारण एसआयटीने पुन्हा त्यांच्या अटकेसाठी प्लॅन केला आहे.

Ashok Kharat case full story
Congress News: जालना महापालिकेतील काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची तडकाफडकी कारवाई

आजची रात्र खरात जेलमध्ये असेल, पण उद्या त्यांची रवानगी पुन्हा पोलिस कोठडीत होण्याची शक्यता आहे. कारण पोलिस त्याला दुसऱ्या गुन्हा अडकणार असल्याचे समजते. त्यासाठी पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे. खरात याची पुन्हा चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

Ashok Kharat case full story
Satara ZP News: मंत्र्यांना धक्काबुकी, अपहरण नाट्यानं रंगलेल्या ZP अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक पुन्हा होणार? विभागीय आयुक्त घेणार निर्णय

उद्या (२ एप्रिल) खरात याला दुसऱ्या गंभीर गुन्ह्यात पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ७६/२०२६ या क्रमांकाच्या गुन्ह्यांत पुन्हा एसआयटी त्याला कोर्टात आणणार आहेत. या दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा पोलीस कोठडीत खेचण्यासाठी एसआयटीने प्रयत्नशील आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीत खरातला बेल मिळणार की जेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Ashok Kharat case full story
Rupali Chakankar News: चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर फार्महाऊसवर 'मुळशी पॅटर्न' जंगी पार्टी ? एका 'स्टेटस'मुळे फुटलं बिंग

खरातची पत्नी कल्पना खरात ही देखील या गुन्ह्यांमध्ये तितकीच सहभागी असल्याचे समोर आले आहे. पोलिस चौकशी करण्यासाठी येण्यापूर्वी ती फरार झाली आहे. पोलीस पथके तिचा शोध घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com