Pankaja Munde statement on acid attack incident Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pankaja Munde : पंकज मुंडेंना आठवलं 'रिंकू पाटील' प्रकरण! अ‍ॅसिड हल्ल्यावर म्हणाल्या, 'देवाभाऊ ही विकृती...'

Pankaja Munde reaction on acid attack case: संगमनेरमधील शाळकरी मुलीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Pradeep Pendhare

Rinku Patil acid attack case controversy: संगमनेर वडगावपान इथं सहावीतील शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ल्यावर भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या दहावीत असताना, झालेल्या रिंकू पाटील प्रकरणाची आठवण त्यांना झाली.

या हल्ल्यातील आरोपींना अजून अटक झालेली नाही. पण घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे. संगमनेर इथल्या वडगावपान चौफुलीवर संगमनेरमधील संतप्त झालेल्या मुलींनी सरकारकडे सुरक्षिततेची मागणी करत, रास्ता रोको केला.

संगमनेमधील 11 वर्षांच्या शाळकरी मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यावर भाजप मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), त्या दहावीत असताना रिंकू पाटीलबरोबर झालेल्या घटनेची आठवण झाली. त्या म्हणाल्या, "मी दहावीत असताना रिंकू पाटील हिच्याबरोबर घटना घडली होती. या घटना घडण्यामागे समाजातील विकृत मानसिकता आहे."

'कायद्याचा (Crime) धाक या विकृत मानसिकता असलेल्यांना नाही. जर तसं झाल्यास व्यवस्थेला काहीच काम राहणार नाही. या लोकांवर अंकुश मिळवणं, त्यांना गजाआड करणं हे काम आहे व्यवस्थेचं.

एखाद्या व्यक्तीची विकृती असेल, मुलीवर अत्याचार करत असेल, नवरा बायकोवर अत्याचार करत असेल, सासू-सासरे सूनेवर अत्याचार करत असतील, याला शिक्षा करण्यासाठी कायद्याला धाक नाही असे कसे म्हणता येईल. याला काहीदृष्टीने स्वतःची मानसिकता देखील जबाबदार असते,' असेही मंत्री मुंडे यांनी म्हटलं.

'कायद्याचा धाक आहे म्हणून, शिक्षेचं प्रमाण वाढलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एवढं शिक्षेचं प्रमाण वाढवलं आहे की, महिला विश्वासाने स्वतः पुढे येऊन तक्रारी नोंदवत आहे. या जागरूकतेमुळे महिला गुन्ह्यांची नोंद करत आहेत. त्यांना न्याय मिळतो आहे. ही गंभीरच घटना आहे. समाजात पाहात असताना, याचे खूप वाईट वाटते. कारवाई होणार, जरूर कारवाई होणार,' असेही मंत्री मुंडे यांनी सांगितले.

चित्रा वाघा म्हणाल्या.....

भाजप आमदार चित्रा वाघ यांनी, तो नराधम लवकरच पकडला जाईल आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. सरकारकडून या प्रकरणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत Zero Tolerance हीच आमची ठाम भूमिका आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT