Sangamner Acid Attack : जयश्री थोरातांचा संताप, ‘प्रवरे’त धाव; अ‍ॅसिड हल्ल्यातील चिमुकलीला दिला धीर, सरकारला सुनावलं...

Youth Congress Jayashree Thorat visited the injured schoolgirl at Loni Pravara Hospital after the Sangamner acid attack and demanded strict action against the accused : संगमनेरमधील अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी शाळकरी मुलगी आणि तिच्या नातेवाईकांना युवक काँग्रेसच्या जयश्री थोरात यांनी प्रवरा रुग्णालयात जात धीर दिला.
Youth Congress Jayashree Thorat
Youth Congress Jayashree Thorat Sarkarnama
Published on
Updated on

Sangamner Crime News : संगमनेर इथल्या वडगाव पान इथं घडलेली अमानुष घटना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी आहे. अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर शाळेतून घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने समाजातील मुली - महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

या घटनेची माहिती मिळताच युवक काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी थेट रुग्णालयात धाव घेतली. प्रवरा मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी मुलीची त्यांनी भेट घेतली, तिच्या कुटुंबीयांना धीर दिला आणि या संपूर्ण प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

“ही फक्त घटना नाही, हा समाजाच्या विवेकबुद्धीवर झालेला हल्ला आहे,” असे डॉ. थोरात म्हणाल्या. “अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीवर ॲसिड फेकलं जातं — ही कोणती विकृती आहे? वडील नसलेली, अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुलगी शिक्षणासाठी (Education) झगडते आहे आणि अशा वेळी तिच्यावर हा भ्याड हल्ला होतो. हे अत्यंत निंदनीय आणि असह्य आहे.”

डॉ. थोरात यांनी प्रशासनावर थेट बोट ठेवत स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, गुन्हेगाराचा तातडीने शोध घेतला गेला पाहिजे. त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. माहित असल्यास नागरिकांनीही पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. “राजकारण, जात, धर्म बाजूला ठेवा — अशा राक्षसी प्रवृत्तीविरुद्ध एकत्र उभे राहण्याची ही वेळ आहे,” असे त्या म्हणाल्या.

Youth Congress Jayashree Thorat
Acid Attack : संतापजनक प्रकार! सहावीतील अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ

सरकारवर जोरदार टीका

या घटनेनंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर कायदे करण्याची मागणी केली. “जोपर्यंत कायद्याची भीती निर्माण होत नाही, तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

Youth Congress Jayashree Thorat
Sangamner Acid Attack : सहावीतील मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; विधिमंडळात संतापाचा स्फोट! पटोले कडाडले, कायंदे गरजल्या तर, विखे म्हणाले...

छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे काय...

“हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, जिथे महिलांचा सन्मान केला जातो. पण आज त्याच महाराष्ट्रात मुलींवर ॲसिड फेकलं जातं — ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” असे म्हणत त्यांनी समाजालाही जागे होण्याचे आवाहन केले.

मुलीवर चाकू हल्ला

डॉ. थोरात यांनी आणखी एक धक्कादायक बाब समोर आणली. कालच संगमनेर तालुक्यात एका मुलीने लग्नाला नकार दिल्याने तिच्यावर चाकू हल्ला झाला आणि आज 13 वर्षीय मुलीवर ॲसिड हल्ला झाला. अशा परिस्थितीत मुलींचा नेमका दोष काय? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

कडक कायदा हवाच...

नियोजित कार्यक्रम रद्द करून डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलीची विचारपूस केली आणि आईसह नातेवाईकांना मानसिक आधार दिला. तसेच त्यांनी प्रशासनावर तातडीच्या कारवाईसाठी दबाव आणला आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्याने कडक कायदे करा, अशी सरकारकडे मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com