Sangamner Acid Attack Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangamner Acid Attack : सहावीतील मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; विधिमंडळात संतापाचा स्फोट! पटोले कडाडले, कायंदे गरजल्या तर, विखे म्हणाले...

The acid attack on a Class 6 schoolgirl in Sangamner triggered strong reactions in the Maharashtra Legislature, with leaders condemning the incident and demanding strict action : संगमनेरमधील सहावीतील शाळकरी मुलीवरील अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकारावरून विधिमंडळात पडसाद उमटले आहेत. विरोधक अन् सत्ताधाऱ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Assembly Acid Attack Issue : संगरमनेरमधील वडगावपान इथल्या सहावीत शिकणाऱ्या मुलीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच पडसाद विधिमंडळात उमटले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घटनेची निंदा करताना राज्यात कायदा-सु्व्यवस्था राहिली की नाही, असा सवाल केला.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी आरोपीला सोडणार नाही, अशी गर्जना केली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, पोलिस कसून तपास करत आहे अन् आरोपीला बेड्या ठोकल्या जातील, अशी प्रतिक्रिया दिली.

शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याने महाराष्ट्र हादरला आहे. संतापजनक घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटले असून, काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले यांनी विधिमंडळात राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल केला.

मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), "ग्रामीण भाग असल्याने तिथं परिसरात सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे पोलिस तपासात अडथळे येत आहेत. हल्लेखोर हा गावातील मुलगाच असू शकतो. पोलिसांचा तपास जलदगतीने सुरू असून, आरोपीला कोणत्याही परिस्थिती बेड्या ठोकल्या जातील." अशा घटनांमधील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी, असे आपले वैयक्तिक मत आहे, असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे या घटनेवर चांगल्याच आक्रमक झाल्यात. कोणताही आरोपी असला, तरी पोलिसांनी तो शोधलाच पाहिजे. हल्ल्यासाठी अ‍ॅसिड नेमकं मिळतं कुठून याचासुद्धा पोलिसांनी शोध घ्यावा. सहावीच्या मुलीला जर विद्रूप करण्याचा प्रकार घडत असेल तर, यावर कठोरातील कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली. पोलिसांवर विश्वास व्यक्त करताना, आरोपी पकडून शिक्षाच व्हायला हवी, तोपर्यंत आम्ही देखील हे प्रकरण सोडणार नाही, अशी गर्जना मनीषा कायंदे यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथं ही घटना घडली असून, मुलीवर उपचार सुरू आहेत. ती घाबरलेली आहे. संगमनेर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस, फाॅरेन्सिक पोलिस देखील हल्लेखोरांच्या शोधासाठी प्रयत्नशील उतरलं आहे. मोबाईल सेल देखील कामगिरी बजावत आहे. लवकरच हल्लेखोरांचा उलगडा होईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT