Acid Attack : संतापजनक प्रकार! सहावीतील अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ

Police have launched an investigation after an acid attack on a sixth-grade girl in Vadgaonpan village of Sangamner, creating shock in the area : संगमनेर इथल्या वडगावपानमधील सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ल्याने खळबळ उडाली आहे.
Acid Attack
Acid AttackSarkarnama
Published on
Updated on

Sangamner crime news : अहिल्यानगरमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस आव्हानात्मक बनू लागली आहे. महिला-मुलींविरोधातील हिंसाचारात वाढ होताना दिसत आहे.

पारनेर इथल्या शाळकरी मुलीवर चार वर्षांपासून कीर्तनकार महाराजाने करत असलेल्या अत्याचाराच्या प्रकाराने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच, संगमनेरमधून पुन्हा संतापजनक घटना समोर आली आहे. सहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाला आहे.

सहावीत शिकणारी ही मुलगी शाळा (School) सुटल्यानंतर घरी चालली होती. त्याचवेळी तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला. तिचा चेहरा भाजला असून, हा हल्ला कोणी केला आहे, याची माहिती अजून समोर आलेली नाही.

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील वडगावपान इथं ही घटना घडली. मुलगी अकरा वर्षांची आहे. चेहऱ्यावरील अ‍ॅसिड पडल्याने ती वेदना नुसती ओरडत आहे. तिला उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Acid Attack
Sagar Moholkar : कुख्यात पैलवान मोहोळकरची ‘राक्षसी ताकद’ की फक्त मिथक? तोंडातून गोळी काढल्याची चर्चा पुन्हा रंगली

मुलीवर हा हल्ला कोणी? कोणत्या कारणातून केला? कशामुळे केला याची शोध घेतला जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोराचा माग काढत आहेत.

Acid Attack
Karjat Missing Case : मिसिंगची तक्रार, उघड झाले दोन मर्डर! अजून दोन हत्यांचा संशय; तरी अकोला PIचा ‘डिटेक्शन दाखवू नका’चा सूर

अ‍ॅसिड हल्ल्यानंतर आरोपी पसार कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे. शाळा परिसरात कोणी संशयास्पद फिरत होते का? याची माहिती काढली जात आहे.

मुलीचे नातेवाईक, वर्ग मित्र, शिक्षकांकडे चौकशी

या घटनेच्या तपासाबाबत पोलिस संवेदनशीलतेने काम करत असून, यात मुलीच्या नातेवाइकांकडे, वर्गातल्या तिच्या मैत्रिणींकडे, शिक्षकांकडे चौकशी करत आहेत. मुलीला वडील नसल्याने ती अन् तिची आई ही माहेरी राहते, अशी माहिती समोर आली आहे. यातच तिच्या वर्गातील मुलांबरोबर सायकल लावण्यावरून वाद झाले होते.

हल्ल्याच्या ठिकाणी आढळली सायकल

हल्लेखोर दोघंजण होते अशीही माहिती समोर येत आहे. पण नेमके कोण होते, याचा अजून उलगडा झालेला नाही. हल्ल्याच्या ठिकाणी एक सायकल पडलेली आहे. ही सायकल नेमकी कोणाची आहे, याचाही तपास पोलिस करत आहेत. अ‍ॅसिड मुलीचा चेहरा होरपळला असून, तिच्यावर उपचार सुरू आहे. तसंच तिची प्रकृती काहीशी स्थिर असल्याची माहिती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिली.

हल्लेखोर अल्पवयी मुलं?

हल्लेखोर हे अल्पवयीन दोन मुलं होती, अशी माहिती समोर येत आहे. या दोन मुलांनी हा हल्ला कशातून केला, खरंच ते होते का? नेमका काय प्रकार आहे, याचा पोलिस तपास घेत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी रवाना झाले आहे. फाॅरेन्सिक टीम देखील तपासात उतरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com