Ambedkar Jayanti DJ Controversy Sangamner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ambedkar Jayanti DJ Controversy Sangamner : 'महामानवावर व्याख्यान चालू असतानाच, डीजेचा दणदणाट'; आंबेडकरांची शिलेदारीन थेट भिडली, तर सत्यजीत तांबेंचा संताप (Video)

During an Ambedkar Jayanti lecture event in Sangamner, Vanchit leader Utkarsha Rupwate and MLA Satyajeet Tambe expressed anger over DJ music played by workers outside the venue : संगमनेरमध्ये महामानव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने व्याख्यान सुरू असलेल्या ठिकाणच्या परिसरात डीजे वाजवण्याचा वारंवार प्रकारावर संताप व्यक्त होत आहे.

Pradeep Pendhare

Sangamner news : महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संगमनेर इथं व्याख्यानाची परंपरा आहे. गेल्या 40 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. व्याख्यानासाठी दिग्गज विचारवंत, राजकीय नेते, आंबेडकरांचे अनुयायी उपस्थित होते. आमदार सत्यजीत तांबे आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते देखील उपस्थित होत्या.

आमदार तांबे विचार मांडण्यासाठी उभे राहिले असताना अन् तत्पूर्वी काही विचारवंत विचार मांडत असतानाच, तिथं परिसरात वारंवार डीजे वाजवला जात होता. या प्रकारावर आमदार तांबे माईकवरून पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त केला, तर उत्कर्षा रूपवते या थेट डीजे वाजवणाऱ्या मंडळाला भिडल्या. डीजे वाजवण्याच्या या प्रवृत्तीचा संगमनेरसह जिल्ह्यात निषेध व्यक्त केला जात आहे.

महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संगमनेर (Sangamner) गेल्या 40 वर्षांपासून व्याख्यानाची परंपरा आहे. यावर्षीही व्याख्यान सुरू होते. त्याचवेळी व्याख्यान कार्यक्रमासमोर काहींनी डीजे दणदणाट सुरू केला. वारंवार सूचना देऊन देखील डीजे वाजवणं सुरूच होतं.

आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) विचार मांडण्यासाठी उभे राहिले असतानाच, डीजे वारंवार वाजवला होता. यावर आमदार तांबे यांनी संताप व्यक्त केला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना डीजे बंद करायला लावला. सुरवातीला पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. डीजे वाजवणं थांबवतो, असा अभिनय सुरू केला. पण डीजे वाजवणं काही थांबवलं जातं नव्हतं.

यानंतर सत्यजीत तांबे यांनी माईकवरून संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "महामानव बाबासाहेबांच्या जयंतीत त्यांची स्फूर्तीगीत वाजवण्याऐवजी भलतेच गाणे वाजवायचे. असे करणाऱ्यांची जागा लोकांनी त्यांना दाखवली आहे, तरी शुद्ध यायला तयार नाही. तिथे बंदोबस्तावर जो कोणी पोलिस असेल, तो डीजे तातडीने बंद करा. हा कार्यक्रम सुरू असेपर्यंत तो डीजे बंद असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला काय तो डीजे चालवायचा, तो चालवा."

'हा कार्यक्रम चाळीस वर्षांपासून सुरू आहे. त्यावेळेस हे कोण कुठं होते आमचा परिवारात महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करणारा परिवार आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर आमचा परिवारावर काम करत राहणार आहे. किंचित देखील या विचारांवरून आम्ही हलणार नाही', असा थेट इशाराच दिला.

यानंतर काही वेळातच डीजेचा आवाज थांबला. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा, महात्मा फुले आणि सावित्री फुले यांचा स्मारक आणि शहीद स्मारक, नगरपालिकेच्यावतीनं करत आहोत, अशी सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.

सत्यजीत तांबेंचा संताप

दरम्यान, सत्यजीत तांबे माईकवर संताप व्यक्त करत असतानाच, या व्याख्यानाला तिथं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते उपस्थित होत्या. त्यांनी थेट डीजे वाजवणाऱ्या मंडळाच्या दिशेनं धाव घेतली. विनंती करत, हात जोडत, डीजे वाजवणं थांबवा, अशी विनवणी केली. उत्कर्षा रूपवते, अशी विनवणी करत असतानाच, काहीजण मुद्दा डीजे चालूबंद करत डिवचतं होते.

उत्कर्षा रूपवते आक्रमक

शेवटी उत्कर्षा रूपवते देखील संतापल्या. तिथं महिला पोलिस होत्या, त्यांनी डीजे वाजवणाऱ्या मंडळाला समजावण्याऐवजी सुरवातीला वेगळीच भूमिका घेतली. रूपवते अन् महिला पोलिसांमध्ये काहीशी शा‍ब्दिक वाद झाला. यानंतर कार्यकर्त्यांनी काहीशी नरमाई घेत, डीजेचा दणदणाट थांबवला. मात्र, या प्रकारावर संगमनेरमध्ये राजकीय चर्चांना जोर धरला आहे. संबंधित प्रवृत्तीची चर्चा होत आहे, निषेधाच्या गोष्टी होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT