Maithili Tambe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maithili Tambe Sangamner Mayor : पहिल्याच बैठकीत नगराध्यक्षा तांबेंचा धडाका! मोठा निर्णय, मानधन नकोच, नगरपालिकेच्या थेट उत्पन्न वाढीचा अजेंडा!

Sangamner Mayor Maithili Tambe Waives Councillor Allowance to Boost Municipal Income : संगमनेर नगरपालिकेचे उत्पन्न वाढीबरोबरच, नगरसेवकांसह अध्यक्षा, उपाध्यक्ष यांच्या मानधनावर मैथिली तांबे यांनी निर्णय जाहीर केला आहे.

Pradeep Pendhare

Sangamner Municipality : संगमनेर इथल्या नगरपालिकेचे उत्पन्न 50 कोटीपर्यंत होत नाही, तोपर्यंत आमचे नगरपालिकेचे नगरसेवकांसह अध्यक्षा, उपाध्यक्ष एकही रुपयाचे मानधन घेणार नाही.

हा पहिला मोठा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतल्याचे नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी जाहीर केले.

संगमनेर (Sangamner) नगरपालिकेची शुक्रवारी पहिली बैठक पार पडली. डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या, "संगमनेर नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर असणार आहे. ते 50 कोटीपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. तोपर्यंत एक रुपयाही मानधन न घेणार नाही." दुसरा निर्णय म्हणजे, प्रजा फाउंडेशन सर्व नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कामकाजाचे, तसेच कुठे कमी पडतात, कुठे चांगले काम होते, याचा अहवाल तयार करणार आहे, असे डाॅ. तांबे यांनी सांगितले.

'नगरसेवकांच्या कामकाजाचे मूल्यमापन प्रजा फाउंडेशन या एका स्वयंसेवी संस्थेकडे असणार असून, ही संस्था मुंबई (Mumbai) बीएमसीबरोबर काम करते. आता, पालिकेच्या पातळीवर नगरपालिका आणि प्रजा फाउंडेशन बरोबर काम करणार आहेत. याशिवाय शहराच्या सुरक्षिततेसाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सुरक्षा बल आहे, त्यांना सामावून घेणार आहे,' असेही डाॅ. मैथिली तांबे यांनी सांगितले.

संगमनेरच्या अग्निशमन दलात दोन वाहने कमी आहेत, ती आधुनिक वाहने घेण्याचा निर्णय ही सगळ्यांनी एकत्र येऊन घेतला आहे. अतिक्रमण वाढलेले आहे. सर्व नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. लवकरच ही अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच शहरात भोंग्याची गाडी फिरवून माहिती दिली जाईल, असेही बैठकीत निर्णय झाल्याचे डाॅ. मैथिली तांबे यांनी सांगितले.

संगमनेर शहरातील मोठ-मोठ्या रस्त्यांवर कार्यक्रम होतात, त्यामुळे शहरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांना त्रास होतो, वाहतूक कोंडीचा त्रास होतो. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम रस्त्यांवर होणार नाही, याबाबत ही निर्णय घेतला आहे, असेही डॉ. तांबे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT