Amol Khatal vs Balasaheb Thorat  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangamner Sugar Factory Election : शिंदेंचा शिलेदार पुन्हा थोरातांना भिडणार; मंत्री विखे रणनीती आखणार?

Shiv Sena MLA Amol Khatal Congress Balasaheb Thorat Cooperative Sugar Factory election Sangamner : संगमनेर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना आव्हान दिलं आहे.

Pradeep Pendhare

Amol Khatal vs Balasaheb Thorat : संगमनेरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याच्या निवडणूक येऊ घातली आहे.

शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी या निवडणुकीची तयारी केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा काँग्रेस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आव्हान देत आहे. विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांच्या विजयामागे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी किंगमेकरची भूमिका निभावली होती. यावेळी मंत्री विखे या निवडणुकीत कोणती रणनीती आखणार, आणि थोरात तिला कसं उत्तर देतात, या चर्चेनं संगमनेरचं राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) आमदार अमोल खताळ चांगलेच अॅक्टिव्ह मोडवर आलेत. ऊस उत्पादक सभासदांचा बैठक घेतली. यावेळी वसंतराव गुंजाळ, दादाभाऊ गुंजाळ, डॉ. अशोक इथापे आदी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले, "संगमनेरचा सहकारी साखर कारखाना हा सभासद अन् शेतकऱ्यांच्या (Farmer) मालकीचा होता. मात्र काही जणांनी हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केला आहे. तसाच कारभार सुरू आहे. तो कारखाना पुन्हा शेतकरी अन् सभासदांचा मालकीचा करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी साखर कारखाना निवडणुकीला समोरे जाणार आहे".

'कारखाना पुन्हा ऊस उत्पादक शेतकरी अन् सभासदाच्या ताब्यात द्यायचा आहे. त्यासाठी आता ही निवडणूक ऊस उत्पादक सभासदांनीच हातात घेतली आहे. त्यामुळे आपण सर्व जण ही निवडणूक पूर्णताकदीनिशी लढविणार आहोत. ही निवडणूक नुसती लढावयची नाही, तर जिंकायची सुद्धा आहे', असे म्हणत आमदार खताळ यांनी वातावरण निर्मिती करण्यास सुरवात केली. निवडणुकीत कारखाना यंत्रणा गैरवापर होणार नाही, याकडे लक्ष ठेऊन निवडणूक पारदर्शी होईल, अशा सूचना प्रशासनाला देणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.

वसंतराव गुंजाळ यांनी जशी विधानसभा निवडणूक लढवून आपण जिंकली आहे. तशीच संगमनेर सहकारी साखर कारखान्याची सुद्धा निवडणूक लढवून जिंकायची आहे. यासाठी धनाजी-संताजी पुढारी हे कोणीच आपले उमेदवार राहणार नाही, तर या निवडणुकीत सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद हेच उमेदवार राहणार आहेत. ही निवडणूक महायुती म्हणून नाही, तर शेतकरी सत्ता परिवर्तन पॅनल या बॅनरखाली लढवणार आहोत, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT