Ahilyanagar police suspect sketch : संगमनेर तालु्क्यातील वडगावपान इथल्या शाळकरी मुलीच्या तोंडावर अॅसिड फेकणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र अहिल्यानगर पोलिसांनी जारी केलं आहे. हे रेखाचित्र जारी करता, संबंधि व्यक्तीविषय़ी माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी संशयिताची माहिती देणाऱ्याला दोन लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
पोलिसांनी माहिती देण्यासाठी नागरिकांना चार फोन क्रमांक जाहीर केले आहेत. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा (0241) 2416111, पोलिस निरीक्षक किरणकुमार कवाडी- 9823256949, उपनिरीक्षक महादेव गुट्टे- 8208446293 आणि उपनिरीक्षक दिपक मेढे- 9175264928 यांचे नंबर जाहीर केले आहेत.
संगमनेर (Sangamner) तालुक्यातील वडगावपान इथं 17 मार्चला दुपारी 13 वर्षांच्या शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ला झाला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. या मुलीची प्रकृती स्थिर जरी असली, तरी तिच्यावर प्रवरा मेडिकल काॅलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ल्याचे विधिमंडळात पडसाद उमटले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ते अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत आणि विधिमंडळातील विरोधकांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्ल्याच्या दुसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम देत गुन्हेगाराला पकडण्याचा सूचना केल्या होत्या. पण अहिल्यानगर पोलिसांना आजपर्यंत हल्लेखोराला पकडण्यात यश आलेलं नाही.
हल्लेखोराच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पूर्ण ताकदी लावली होती. याशिवाय संगमनेर पोलिसांची सहा ते सात पथकं मैदानात होती. नाशिकमधील विकृती भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस आणणाऱ्या शिर्डी, अहिल्यानगर पोलिसांनी, राज्यपातळीवर वाहवा मिळवली. पण तेच पोलिस आता, 15 दिवस झाले तरी शाळकरी मुलीवरील अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांनी त्या परिसरातील झालेल्या पाच लाखांपेक्षा जास्त काॅलची तपासणी केली. चारशे ते पाचशे जणांचे फोटोचं पीडितेकडून क्राॅस चेक करून घेतलं. सुमारे साठ ते सत्तर जणांचे जबाब नोंदवले आहेत. फाॅरेन्सिक टिमने वेगवेगळ्या पातळीवर तपासणी केली. घटनास्थळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली. घटनाक्रम नाट्यमय रूपांतर करत, आजूबाजूच्या सर्व शक्यता पोलिसांनी तपासून पहिल्या आहेत.
आता अहिल्यानगर पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र जारी केले आहे. या रेखाचित्राचा आधार घेऊन, काही पथकांकडून परिसरात आणि आजूबाजूला तपास सुरूच ठेवला जाणार आहे, असे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
वडगावपान इथं ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. या आंदोलनात युवक काँग्रेस अध्यक्षा जयश्री थोरात आणि आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात गावकऱ्यांनी आरोपीच्या शोधासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. आता पोलिसांनी संशयित हल्लेखोराचे रेखाचित्र जारी केलं आहे. पोलिस तपासात काहीच निष्पन्न होत नसल्याने, ग्रामस्थ नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.