Balasaheb Thorat On Political Kirtan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat On Political Kirtan : तथाकथित महाराजांचं राजकीय भाष्य, खोट्या गुन्ह्यातून छळ अन् दहशत निर्माण करणारी 'शक्ती'; बाळासाहेब थोरातांनी संगमनेरकरांना केलं सावध

Balasaheb Thorat Reacts to Political Remarks at Sangrambapu Bhandare Maharaj Kirtan in Sangamner Ghulewadi : संगमनेर इथं संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या कीर्तनातील राजकीय भाष्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरकरांना सावध केलं आहे.

Pradeep Pendhare

Sangamner political controversy : संगमनेरच्या घुलेवाडी इथं अखंड हरिनाम सप्ताहात संग्रामबापू महाराज यांचं राजकीय भाष्य आणि हिंदू-मुस्लिम विधानानंतर गोंधळ झाला. महाराजांना धक्काबुक्कीनंतर त्यांच्या वाहनावर देखील हल्ला झाला. याप्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी निशाणा साधल्यानंतर, त्याला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरकरांना सावध करत, दहशत निर्माण करणारी शक्ती ओळखा, असं आवाहन केलं आहे. कथाकथित महाराजांचा विधानांचा सूचक, असा समाचार घेताना, वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ सर्वसमावेशक असून, त्याचं पथ्य अन् नियमांची आठवण नागरिकांनीच शांततेच्या मार्गानं करून दिल्याकडे बाळासाहेब थोरातांनी लक्ष वेधलं.

संगमनेर (Sangamner) शहरातील घुलेवाडी इथं अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनात संग्रामबापू भंडारे महाराज यांनी राजकीय भाष्य केलं. हिंदू-मुस्लिमावर विधान केल्यानं कीर्तनात गोंधळ झाला. भंडारे महाराजांना धक्काबुक्की अन् त्यांच्या वाहनाचा तोडफोड झाल्याचा आरोप होत आहे. संगमनेर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आज निषेध मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. भाजप अध्यात्मिक सेलचे तुषार भोसले मोर्चात सहभागी होणार आहे.

हा सगळा प्रकार राजकीय वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत असून तुकाराम महाराजांच्या अंभगावरील निरूपण करताना, कीर्तनात राजकीय भाष्य केल्याचा आरोप महाराजांवर होत आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कथाकथित महाराजांच्या राजकीय भाष्यावर आणि संगमनेरची संस्कृती बिघडवणाऱ्या शक्तींवर घणाघात केला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "अखंड हरिनाम सप्ताहमध्ये जे घडलं, ते सर्व संगमनेरकरांनी समजून घेतलं पाहिजे. संगमनेर तालुका शांतता, बंधूभाव जपणारा आणि विकासासाठी सातत्यानं कास धरणारा तालुका आहे. हरिनाम सप्ताहमधील कीर्तन हे, वारकरी संप्रदायाचे विचार मांडणारे व्यासपीठ आहे. संतांचे विचार मांडणारे व्यासपीठ आहे. त्याच्या काही मर्यादा आहेत. पथ्य आहेत. इथं पथ्य आहे की, इथं राजकारण नको. कारण इथं व्यासपीठावर सर्व राजकीय लोक एकत्र येत असतात. बंधुभावाचं वातावरण तिथं निर्माण होत असतं."

महाराजांच्या राजकीय भाष्यावर टिप्पणी

'कथाकथित महाराजांनी तिथं राजकारण सुरू केलं. राजकारणावर भाषण सुरू केलं. यामुळे नागरिकांनी थोडा विरोध केला. नागरिकांनी केलेला विरोध हा शांततेच्या मार्गानं हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे'. त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेसकडे बाळासाहेब थोरातांनी लक्ष वेधलं.

संगमनेरविरोधी शक्तींना ओळखा

बाळासाहेब थोरात म्हणाले, "संगमनेर तालुक्यात होणाऱ्या खोट्या केसेस, त्यामध्ये चुकीचे, खोटी-नाटी कलम लावली जात आहेत. यातून छळा प्रकार होत आहे. दहशत निर्माण केली जात आहे. माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे." आपल्या तालुक्याची शांतता भंग केली जात आहे. तालुका सुजलाम्-सुफलाम्, अशी विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत, ती वाटचाल मोडून काढण्यासाठी काही शक्ती काम करत आहेत. यापासून संगमनेरकरांनी साधव राहिल, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं.

विधानसभेपूर्वीच्या मोर्चाची आठवण

बाळासाहेब थोरातांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या मोर्चाची आठवण करून दिली. तिथं भाषण करायाची, वातावरण दूषित करायची. आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आल्या आहेत. काल काय घडलंय, हे समजून न घेताच, मोर्चा काढाला जात आहे. यातून संपूर्ण तालुका वेठीस धरायचा, विकास रोखण्याचं काम सुरू आहे, असा घणाघात केला.

संगमनेरकरांची जबाबदारी वाढली

संगमनेरकरांना विनंती करताना, बाळासाहेब थोरात म्हणाले, "आपण जी राजकीय संस्कृती निर्माण केली, बंधूभाव, विकासाची वाटचाल आहे, ती कायम राहिली पाहिजे, चालली पाहिजे, संगमनेरची सुसंस्कृत संस्कृती टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. ती कुणी मोडण्याचा प्रयत्न करत असेल, तर संगमनेरकरांनी पुढं आलं पाहिजे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT