Anna Hazare : अण्णा हजारेंसाठी सामाजिक कार्यकर्ते मैदानात, पोस्टरच्या माध्यमातून पुणेरी टोमणे मारणाऱ्यांना पुणेरी भाषेतच सुनावलं

Senior social activist Vijay Kumbhar On Anna Hazare Pune banner controversy : पुण्यातील पाषाण परिसरात ज्येष्ठ गांधीवादी अण्णा हजारे यांच्या छायाचित्रासह लागलेल्या पोस्टरवरून आता वाद सुरू झाला आहे. या पोस्टरवरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी फटकारलं आहे.
Anna Hazare on Pune controversy
Anna Hazare on Pune controversySarkarnama
Published on
Updated on

Summary :

  • पाषाण परिसरात अण्णा हजारे यांच्या फोटोसह मत चोरीविरोधी संदेश असलेले बॅनर झळकले.

  • बॅनरवर कोणत्याही संघटनेचे नाव नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र टीका केली.

  • विजय कुंभार यांनी या गुप्त कार्यकर्त्यांना “धमक नाही नाव लिहिण्याची” असा टोला लगावला.

Pune News : पुण्याच्या पाषाण परिसरामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो असलेले बॅनर राज्यभरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनर च्या माध्यमातून अण्णा हजारे यांना पुणेरी टोमणे मारल्याचे पाहायला मिळाले. तर 'आता तरी उठा अण्णा, मत चोरी झालेली आहे', असं या पोस्टर वर लिहिण्यात आला आहे. तिकडे या बॅनरच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील नेते अण्णा हजारे यांना लक्ष करत असतानाच आता दुसरीकडे अण्णा हजारेंसाठी सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. यामुळे आता पुण्यात अण्णा हजारे कार्यकर्ते विरूद्ध महाविकास आघाडीतील नेते असा सामना रंगला आहे.

नेमकं काय लिहिलं आहे बॅनरवर

पाषाण परिसरात लागलेल्या बॅनर वर अण्णा हजारे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यासोबतच कुंभकर्णाचा देखील फोटो या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. तर अण्णा आता तरी उठा, कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा असे आवाहन या बॅनरच्या माध्यमातून अण्णा हजारे यांना करण्यात आलं आहे.

Anna Hazare on Pune controversy
Anna Hazare on Pune controversy : अण्णा हजारेंना 'पुणेरी टोमणे' झोंबले; म्हणाले, '10 कायदे आणले, नव्वदीत देखील करत राहायचं का?'

देशात मतांची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफावला असताना, देशात हुकूमशाही माजलेली असताना, देशाची लोकशाही धोक्यात आली असताना. अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा असा देखील सवाल या पोस्टरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप

अण्णा हजारे यांचे पोस्टर लावणाऱ्यांवर सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबत एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. विजय कुंभार म्हणाले, अण्णा हजारे यांच्या सामाजिक कार्याविषयी मतभेद असू शकतात, माझेही आहेत. पण त्यांचं वय लक्षात घेता आता त्यांच्याकडून आणखी अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं आहे.

पुण्यातल्या पाषाण परिसरात अण्णांचा फोटो असलेले बॅनर झळकत आहेत, ज्यावरून पुणेरी पद्धतीने त्यांना टोमणे मारले गेलेत. “आता तरी उठा, मत चोरी झालेली आहे” असं त्यावर लिहिलं आहे. परंतु हे बॅनर लावणाऱ्या शूरवीरांमध्ये स्वतःचं किंवा संघटनेचं नाव लिहिण्याचीसुद्धा धमक नाही, असा टोला कुंभार यांनी लगावला आहे.

पण खरी गोष्ट अशी आहे की—आजही अण्णांनी उठून लढा द्यावा अशी अपेक्षा करणारे लोक आहेत. पण या लोकांनी स्वतःचं तारुण्य वाया घालवले आहे. आता अण्णांचं वय झालं आहे, ते खरं ही आहे. मात्र तथाकथित कार्यकर्ते आणि लोकशाहीचे ठेकेदार असणारे ऐन तारुण्यातच म्हातारे झाले आहेत! शब्दात पोस्टर लावणाऱ्यांना विजय कुंभार यांनी फटकारलं आहे.

Anna Hazare on Pune controversy
Anna Hazare News: 'अण्णा... आता तरी उठा, कुंभकर्ण सुद्धा...'; 'मतचोरी'चा मुद्दा तापला असतानाच पुण्यात झळकले हजारेंना डिवचणारे पोस्टर

FAQs :

प्र.१: अण्णा हजारे यांचे फोटो असलेले बॅनर कुठे दिसले?
उ: पुण्यातील पाषाण परिसरात.

प्र.२: बॅनरवर काय लिहिले होते?
उ: “आता तरी उठा, मत चोरी झालेली आहे.”

प्र.३: विजय कुंभार यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उ: त्यांनी म्हटले की बॅनर लावणाऱ्यांना नाव टाकण्याचीही धमक नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com