Sangrambapu Bhandare Kirtan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangrambapu Bhandare Kirtan : 'यांचासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान

Balasaheb Thorat Reacts to Sangrambapu Bhandare Nathuram Godse Remark in Sangamner : संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या नथुरामजी गोडसे होण्याच्या भाषेवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Sangamner political news : तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी संगमनेरमधील कीर्तनानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना इशारा देताना आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावे लागले, अशी भाषा वापरली होती.

यावर बाळासाहेब थोरातांनी आज पत्रकार परिषद घेत, 'मी काही महात्मा गांधी नाही अन् होऊ शकत नाही. परंतु असा कुणी नथुराम गोडसे समोर आल्यावर, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील', असा मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरातांच्या या प्रतिक्रियेचे संगमनेरसह महाराष्ट्रात भावनिक पडसाद उमटू लागले आहेत.

काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत संगमनेरमधील कीर्तनातील राजकीय गोंधळावर भाष्य केले. तसेच तथाकर्थित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी नथुरामजी गोडसे होण्याची वापरलेली भाषेवर प्रतिक्रिया देताना, कीर्तनकारांची पथ्य काय? राज्यघटनेतील मुलभूत तत्व काय आहेत? याची मांडणी करताना विरोधकांना सुनावलं आहे.

संग्रामबापू भंडारे यांनी, मला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल, असा इशारा दिला आहे. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, "संगमनेरच्या (Sangamner) घुलेवाडीतील कीर्तनात घडलं काय, त्यावर त्यांना कुणी थांबवलं नाही. परंतु त्यांनी मूळ अभंग सोडून, ज्यावेळेस ते इकडचे-तिकडचे, दुसरे विषय बोलायला लागले, स्थानिक राजकारणावर बोलायले लागले, राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वावर बोलायला लागले, नकारात्मत बोलायला लागेल, तेव्हा एका युवकाने उभं राहून, महाराज तु्म्ही अभंगावर बोला, एवढचं म्हटला."

'कीर्तनात काय काय वक्तव्य केले महाराजांनी, तर ते तथाकथित महाराज आहे. खऱ्या वारकारी संप्रदायाच्या परंपरेत काही असे घुसले आहेत, राजकारण करण्यासाठी घुसले आहेत, त्यातला तो प्रकार आहे. आणि त्यानंतर त्याने जे केलं, कुणीही त्यांचं कीर्तन तिथं थांबवलं नाही, कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही, त्यांच्या गाडीची तोडफोड झालेली नाही, तिथं पत्रकार मंडळी होती. त्यांना सर्व माहिती आहे', असे थोरातांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले.

परंतु खोट्या-नाट्या केसेस करणं, हा सर्व उद्योग सुरू झालेले आहेत. माझं मत असे आहे की, इथले लोकप्रतिनिधी, इथले महाराज कुणाच्या तरी हातातील खेळणं बनलेले आहेत. संगमनेर तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्रात देखील, अशीच वक्तव्य करत फिरत असतात, ही वस्तूस्थिती असल्याचे गंभीर निरीक्षण बाळासाहेब थोरातांनी नोंदवले.

'नथूराम गोडसे व्हावे लागेल, महात्मा गांधीजींसारखं, असं बलिदान आल्यास आनंदानं घेईल मी! जर कुणी, तत्त्वाकरता, विचाराकरता जगत असताना, कुणी आमच्यासमोर, असा नथुराम गोडसे आला एखादा तर, मी बलिदान घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, आनंद घेईल. मी महात्मा गांधी नाही, पण विचाराकरताना बलिदान आनंदानं स्वीकारण्याची तयारी आहे', असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT