Sanjay Raut sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊत न्यायालयावर भडकले, म्हणाले, 'टाळे लावा...'

Roshan More

Sanjay Raut News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. न्यायालयात आमदार अपात्रेबाबत अंतिम निकाल आलेला नाही. मात्र, निकाल लागण्यास दिरंगाई होत असल्याने ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट न्यायालयावर आगपाखड केली आहे.

'तीन वर्ष झाली न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळं लावायला पाहिजे. न्यायाधीश सांगतात हे सरकार घटनाबाह्य आहे. मात्र निकाल देत नाही. हा अंधा कानुन आहे. धा कानूनचे डोळे काढण्याची वेळ आली आहे.', असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना मूळ पक्ष एकनाथ शिंदे यांना दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील पक्षाच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांच्या बाजुने निर्णय दिला. तसेच आमदार अपात्रता प्रकरणात दोन्ही गटातील आमदारांना अपात्र ठरवले नाही. त्याच्या विरोधात ठाकरे गट न्यायालयात गेला आहे.

तीन वर्ष होऊनही या प्रकरणात निर्णय होत नसल्याने संजय राऊत यांनी जळगावमध्ये ठाकरे गटाच्या झालेल्या कार्यक्रमात संताप व्यक्त केला. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना राऊत यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली.

400 पार झाले असते तर त्यांनी घटना जाळून टाकली असती. पण महाराष्ट्राने त्यांना ब्रेक लावला. मराठी माणसाच्या नादी लागू नका. तो पेटत नाही आणि पेटला विझत नाही, आता ठिणगी पडली आहे. त्याचा वणवा पसरला आहे, असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडून बंद मागे

बदलापूरच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने शनिवारी (ता.24) बंद पुकारला होता. मात्र, बंद करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंद पाळण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे हा बंद मागे घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितली. मात्र, उद्या शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT