Chhagan Bhujbal, NCP Leader Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संजय राऊत नंतर आले, त्याआधी `सामना`च्या उभारणीत माझे योगदान!

श्री. भुजबळ यांनी आज येत्या ३ ते ५ डिसेंबरला नाशिकला होणाऱ्या अ. भा. साहित्य संमलेनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्याची माहिती दिली.

Sampat Devgire

नाशिक : चांगले काम केल्याशिवाय कोणी दखल घेत नाही. पदही मिळत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी (Shivsena suprimo Balasehsb Thakre) देखील माझे योगदान पाहूनच मला पद दिले असणार. `सामना`च्या प्रकाशनाचा फोटो (Daily SAMNA) पाहिला तरी माझे त्यात योगदान होतेच. मात्र तेव्हा संजय राऊत `सामना`मधे नव्हते, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

श्री. भुजबळ यांनी आज येत्या ३ ते ५ डिसेंबरला नाशिकला होणाऱ्या अ. भा. साहित्य संमलेनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्याची माहिती दिली. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी रविवारी भुजबळ यांच्याविषयी केलेल्या विधानाबाबत मतप्रदर्शन केले. ते म्हणाले, संजय राऊत काय बोलले हे मला माहीत नाही. मात्र वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्यात, त्यावरून मी एव्हढेच म्हणेन, की शिवसेनेमुळे मी मंत्री आहे, हे मी सदैव मान्य करतो. त्यात काहीच शंका नाही. मात्र काही तरी योगदान असल्याशिवाय काहीच मिळत नसते. सार्वजनिक जिवनात काम करताना धाडस, धीर, परिश्रम, धोका पत्करण्याबरोबरच संकटांना सामोरे जाण्याची देखील तयारी ठेवावी लागते.

ते पुढे म्हणाले, शिवसेनेच्या विस्तारासाठी देखील आम्ही ते केले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची दखल घेऊनच मला पद दिले असेल. अगदी सामनाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाचे छायाचित्र पाहिले, तर छायाचित्रात डाव्या, उजव्या बाजुला नजर टाकली तर त्यात माझे देखील काही तरी योगदान असल्याचे दिसेल. मात्र तेव्हा संजय राऊत सामनामध्ये नव्हते. ते चार पाच वर्षांनी आले. तेव्हा त्यांनी ते पहावे. सामनामध्ये यापूर्वी अनेक संपादक झालेत. मात्र फक्त खासदार संजय राऊत खासदार झाले. त्यांनी काही तरी चांगले काम केले असेल. त्याची दखल घेऊन ते खासदार झाले. यापूर्वीच्या संपादकांना कुठे काय मिळाले? असा टोमणा त्यांनी मारला.

खासदार राऊत यांनी `छगन भुजबळ यांनी नांदगाव विसरावे. तिकडे येऊ नये` असे म्हटले होते. यावर भुजबळ म्हणाले, आता नांदगावला जायचे की नाही, ते मी शरद पवारांशी चर्चा करेन. त्यांना विचारूनच निर्णय घेईल. ते म्हणाले, राऊत यांना माहित नसेल, त्याआधी दहा वर्षे नांदगावचे आमदार होते. तीथे आम्ही अनेक कामे केली आहेत. उत्तम प्रशासकीय कार्यालय, रस्ते, पाण्याचे बंधारे बांधण्याचा विक्रम केला. मनमाडच्या पाणी प्रश्नासाठी येवल्याच्या शेतकऱ्याचा वाईटपणा घेऊन जमिनी घेतल्या. तीथे तलाव बांधला. २६ किलोमीटर लांबीची पाईपलाईन करून मनमाडला पाणी आणले. या कामातून मोठा मित्र परिवार जोडला गेला आहे. कदाचीत राऊत साहेबांना हे माहित नसावे.

संजय राऊत `ती` काळजी तुम्ही घ्या!

श्री. भुजबळ म्हणाले, माझे कोणाशीही वाद नाहीत. शिवसेना कार्यकर्ते, नेते कोणाशीही नाही. अगदी मी कोणाचे नाव घेतले नाही की, टिका केली नाही. मात्र शरद पवार आहेत तसेच संजय राऊत देखील महाविकास आघाडीचे एक शिल्पकार आहेत. एखादे सुंदर शिल्प झाले तर त्याला तडा जाईल असे काम शिल्पकाराकडून होता कामा नये. अगदी साधा ओरखडा देखील उमटणार नाही काळजी शिल्पकाराने घ्यायची असते. त्यामुळे संजय राऊत यांनी त्याची अधिक काळजी घ्यायला हीव असे मला वाटते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT