Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut; एकनाथ शिंदे गटाची हीच लायकी आहे!

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी राज्यातील (Maharashtra) सर्व लोकसभा (Loksabha) मतदारसंघात पक्ष तयारी करीत असल्याचे विधान केले होते. शिवसेनेसोबत (Shivsesna) असती तर त्यांची अशी हिंमत झाली नसती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची हीच लायकी आहे, अशी टिका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. (Shivsena spoaksperson Criticised BJP for spoiling politics in Maharashtra)

भारतीय जनता पक्षाला शिवसेनेचा हाच रुबाब दरारा संपवायचा होता, अशी पुष्टी त्यांनी जोडली. नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लोकसभेच्या जागांबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राज्यातील ४८ जागांचे फेकलेले तुकडे तुम्ही चघळता, राज्यात फडणवीस यांनी तर देशात नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी घाणेरडे राजकारण आणले. कोणाच्या कुटुंबासोबत आम्ही राजकारण कधीच केले नाही ना बाळासाहेबांनी केले व ना शरद पवारांनी केले, आम्ही तुरुंगात गेलो. नवाब मलिक, देशमुख तुरुंगात गेले. आमच्याकडे असलेले पुरावे खोटे आणि तुमचे पुरावे खरे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित करीत आम्ही तोंड उघडल्यास महाराष्ट्रात मोठा स्फोट होईल, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले, आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप २४०, तर शिवसेना ४८ जागा लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे गटावर शाब्दिक हल्ला चढविताना त्यांची हीच लायकी असल्याचे वक्तव्य केले.

ते पुढे म्हणाले, शिंदे गटाने स्वाभिमान गहाण टाकला आहे. नाशिकपासून शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघाला यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला हा सरकारचा हलगर्जीपणा आहे. शेतकरी हवालदिल आहे. मात्र सरकार फोडाफोडी व विरोधकांच्या नाड्या आवळण्यामध्ये व्यस्त आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे व उद्योजकांचे प्रश्न कळते का, असा सवाल करताना सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत मराठी माणसाला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT