Uddhav Thackeray; एकनाथ शिंदेंना दुसरा धक्का, शिवसैनिकांची घाऊक घरवापसी!

नाशिक येथे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत गेलेले शिवसैनिकांनी स्वगृही प्रवेश केला.
Sanjay Raut with Shivsena leaders
Sanjay Raut with Shivsena leadersSarkarnama

नाशिक : (Nashik) शिवसेनाप्रमुख (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून शिंदे सेनेत (Eknath Shinde) गेलेल्या शिवसैनिकांची पुन्हा घरवापसी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत शनिवारी अनेक शिवसैनिक पुन्हा स्वगृही परतले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. (Many Shivsena workers came back to Uddhav Thackeray Group)

Sanjay Raut with Shivsena leaders
Dindori Loksabha; राज्यमंत्री भारती पवार यांना `कसबा` पॅटर्नचे आव्हान?

कालच कोकणातील नेते योगेश कदम यांच्या कट्टर समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश करीत शिंदे गटाला धक्का दिला होता. त्यानंतर आम्हाला खोटी आश्वासने देऊन आमची दिशाभूल करून आम्हाला गद्दारांच्या कळपात नेल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी या शिवसेना कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आता अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रवेश केलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अभिवचन दिले. संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत करण्यात आले

Sanjay Raut with Shivsena leaders
Amruta Pawar News; छगन भुजबळ यांच्या त्रासामुळेच राष्ट्रवादी सोडला!

स्वगृही परत आलेल्यांमध्ये विनोद नुनसे, स्वप्नील गायकवाड, पवन संसारे, समीर कांबळे, प्रकाश उन्हवणे, सार्थक भामरे, दादू खंडारे, सार्थक तालखेडकर, प्रवीण पवार, किशोर आहेर, अभिलाष चव्हाण, राहुल पिंगळे, चेतन पानसरे, चेतन गायकवाड, सचिन धनेधर, गणेश वाबळे, निखिल पाटील, रोहित बाविस्कर, भवन जाधव, राहुल येवले हे प्रमुख आहे,

Sanjay Raut with Shivsena leaders
Nashik Loksabha; अमृता पवार ठरू शकतात लोकसभेच्या गेम चेंजर!

याशिवाय शिंदे गटाच्या नेत्यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज राजपूत, दिनेश शिंदे, भावेश पगार यांचा समावेश आहे. यावेळी या कार्यकर्त्यांनी घरवापसी झाल्याने मोकळे वाटते आहे. गेले काही दिवस आमचा कोंडमारा होत होता. आमची दिशाभूल करून शिंदे गटात प्रवेश केला होता. आश्वासने देऊन गद्दारांच्या कळपात नेले होते, असे सांगितले.

या वेळी उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, कुणाल दराडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावित, माजी महापौर विनायक पांडे, शोभा मगर, शोभा गटकळ, मंगला भास्कर, विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे, राहुल दराडे, वीरेंद्र टिळे, राजेंद्र क्षीरसागर आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com