Sanjay Raut: Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Loksabha : नगर दक्षिणसाठी ठाकरे गटाचा 'हा' असणार चेहरा; संजय राऊतांकडून शिक्कामोर्तब

Pradeep Pendhare

Ahmednagar News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिर्डी (ता. राहाता) येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. याचवेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर राऊत यांनी मोठे भाष्य केले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार यांच्याकडे आहे. जागा बदलून मिळण्याच्या कोणत्याच गोष्टीवर चर्चा झाली नाही. परंतु शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख हे प्रबळ, सक्षम आणि योग्य उमेदवार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत साईसमाधीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सभापती राहुल नार्वेकर यांची भेट, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त व्हावा, अशी प्रार्थना साई समाधीचे दर्शन घेत केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

यावेळी मंत्री विखे हे महसूल मंत्री नसून 'आमसूल'मंत्री असल्याचा टोला देखील राऊतांनी लगावला. साईसंस्थानचे माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, सचिन कोठे, शिवसेना तालुकाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रभा घोगरे, संजय छल्लरे, सुयोग सावकारे, श्रीकांत मापारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, अपात्र आमदारांचा निकाल येणार आहे. या निकालापूर्वी सो-काॅल्ड न्यायमूर्ती राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. बंद दाराआड चर्चा झाली याकडे लक्ष वेधत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना स्थापन केली, त्यावेळी एकनाथ शिंदे हे गोधडीत असतील, किंवा नसतील. परंतु ५५ वर्षापूर्वी बाळासाहेबांनी स्थापन केलेलीच शिवसेना खरी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकाला अगोदरची ही भेट म्हणजे, न्यायदान अयोग्य पद्धतीने होणार असल्याचे संकेत आहेत. आरोपीकडे चहा जाऊन प्यायला लागल्यास सो-काॅल्ड न्यायमूर्ती यांच्याकडे न्यायदानाची अपेक्षा कशी करायची, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT