Kolhapur Politics : ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षाचा 'प्रताप'; एक लाखाच्या मोबदल्यात...

Kagal Shivsena News : कर्जबाजारी आणि आर्थिक गरजवंतांना हेरुन...
Shivsena News
Shivsena News Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरातून ठाकरे गटातील एका तालुकाध्यक्षाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुकाध्यक्षाच्या पराक्रमामुळे कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या अस्मितेला धक्का लागला आहे. एक लाखाला तीन लाख रुपये बनवून नोटा छापून देण्याचा ठाकरे गटाच्या एका तालुकाध्यक्ष सुरू केला होता.

पोलिसांना याची कुण कुण लागताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या तालुका प्रमुखांसह टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे टोळीचा मुख्य सूत्रधार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा तालुकाप्रमुख असल्याचे पोलीस तपासात समोर आली आहे.

Shivsena News
Narayan Rane on Uddhav Thackeray : कोरोना काळात लोक मरत होते; इकडे ठाकरे टेंडरमागे 15 टक्के घेत होते, राणेंचा थेट आरोप

नोटा छापून देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालण्याचे काम ही टोळी करत असल्याची माहिती पोलिस (Police) अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली होती. पोलिसांनी त्यांचा शोध घेत आंतरराज्यीय रॅकेटवर कारवाई केली. या टोळीचा सूत्रधार अशोक बापू पाटील (वय ५१, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) याच्यासह मेहरूम अल्ताफ सरकवास (वय ४१) आणि सलील रफिक सय्यद (वय ३०, दोघे रा. घटप्रभा, जि. बेळगाव, कर्नाटक) या तिघांना पोलिसांनी अटक केले.

त्यांच्याकडून एक लाखाची रोकड आणि नोटा(Money) छपाईचे साहित्य असा दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तिघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक पाटील हा शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचा कागल तालुकाध्यक्ष आहे अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. तर मेहरूम सरकवास ही महिला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून या कारवाईची माहिती मिळाली. संशयित अशोक पाटील हा कर्जबाजारी आणि आर्थिक गरजवंतांना हेरुन कर्नाटकातील साथीदारांच्या मदतीने तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली. पोलीस अधीक्षक पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com