Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut News: थुंकण्याबद्दल विचारताच संजय राऊत पुन्हा भडकले; म्हणाले....

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शुक्रवारी (२ जून) आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ऑन कॅमेरा थुंकले होते. त्यांच्या या कृतीनंतर राज्यभरातून त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यानंतर त्यांनी स्वत:यावर प्रतिक्रियाही दिली आहे.

संजय राऊत यांच्या या कृतीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टिका केली होती. संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती. त्यावर संजय राऊत यांनी आज (३ जून) त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे.

ज्याचं जळतं त्याला कळतं आम्ही भोगत आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार कधीही होत नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. इतकंच नव्हे तर, “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी म्हटलं आहे.

भर पत्रकार परिषदेत विरोधकांच्या मुद्द्यावर थुंकल्याबद्दळ त्यांना प्रश्न विचारण्यात आला. असं असेल तर दररोज 130 कोटी जनतेला माफी मागावी लागेल. मी कुठेही सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही. मी कोणत्याही राजकीय नेत्यांवर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्यांनी महाराष्ट्र, शिवसेना, ठाकरे कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत बेईमानी केली, त्यांची नावं आल्यावर माझी जीभ चावली गेली, त्यातून ती कृती झाली. यांना काही कळतं का?, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांना नाशिक मध्ये सुरक्षा पुरवण्यात आली होती. यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. मला सुरक्षेची गरज नाही. ज्यांनी बेईमानी केली त्यांना सुरक्षा द्या, सुरक्षा परत पाठवा, मी वन मॅन आर्मी आहे. असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT