Nashik News : 85 लाखांची रक्कम अन् तब्बल ३२ तोळे सोने! शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात सापडलेले घबाड बघून अधिकारी चक्रावले

ACB News : नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली होती.
ACB action against Bribe
ACB action against BribeSarkarnama

Nashik Bribe News : नाशिक (Nashik) महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी अटक केली होती. पन्नास हजारांची लाच स्वीकारताना एसबीने त्यांना ताब्यात घेतले होते. धनगर यांच्यासह एका कर्मचाऱ्यास देखील ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी एसीबीने सुनीता धनगर यांच्या घरावर धाड टाकली. त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

सुनिता धनगर (Sunita Dhangar) यांच्या लाचखोरीमुळे महापालिकेच्या (Municipality) शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला. सुनिता धनगर यांच्याकडे घराच्या झडतीमध्ये एसीबीला मोठी रोख रक्कम आणि कोट्यवधींची मालमत्ता हाती लागली. घरात तब्बल ३२ तोळे सोने आणि ८५ लाखांची रोख रक्कम मिळाली.

ACB action against Bribe
Dhananjay Munde News : मी रात्रभर झोपलो नाही; कारण, गोपीनाथ मुंडेंचे फोटो... : धनंजय मुंडेंकडून आठवणींना उजाळा

त्याच प्रमाणे सुनिता धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची माहिती एसीबीने दिली. आडगाव येथे प्लॉट असून एक फ्लॅट टिळकवाडी व दुसरा फ्लॅट उंटवाडी येथे आहे. त्या राहत असलेला फ्लॅट 3bhk असून त्याची किंमत जवळपास दीड कोटी रुपये आहे.

ACB action against Bribe
Dhananjay Munde Advice Pankaja : पंकजाताई, कुठं काय बोलावं अन्‌ त्या बोलण्यानं आपलं नुकसान होणार नाही, याची काळजी घे; धनंजय मुंडे यांचा सल्ला

दरम्यान, न्यायालयाने एका संस्थेला शिक्षकाला कामावर रुजू करण्याचे आदेश देऊनही संस्था निलंबन लावत होती. त्यामुळे याविषयी दाद मागण्यासाठी संबंधित शिक्षकाने सुनिता धनगर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यासंदर्भातील आदेश काढण्यासाठी धनगर यांनी ५० हजार व त्या कार्यालयातील लिपीक नितीन जोशी याने पाच हजार रुपये शिक्षकाकडे मागितले होते. ते पैसे देत असतानाच एसीबीने धाड टाकली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com